११ वर्षांपासून ब्रिटिश पोलिस शोधतायेत हॅरी पॉटरचं ‘ते’ सिक्रेट कार्ड

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत ‘हॅरी पॉटर’ चे वेड अजुनही संपलेले दिसून येत नाही. त्याचे आकर्षण मुलांना आहे. याच हॅरी पॉटरचे ते सिक्रेट कार्ड ११ वर्षांपासून ब्रिटिश पोलिस शोधत आहे. नक्की हे कोणते सिक्रेट कार्ड आहे. ज्यामुळे लेखिका जे.के. रोलिंग त्या कार्ड च्या शोधात आहे. चोरी झालेल्या या कार्डमध्ये असे काय असेल ज्यामुळे ‘पी. सी. पॉल’ पोलिस अधिकारी इतकी वर्ष या प्रकणाचा तपास करत आहे. जाणून घेऊया…..

हॅरीला जन्म घालणारी लेखिका जे.के. रोलिंग सध्या एका पोस्टकार्डच्या शोधात आहे. हे पोस्टकार्ड २००८ मध्ये बरहिंगम येथे एक ऐतिहासिक वस्तुंचे प्रदर्शन होते. त्यामधून हे पोस्टकार्ड चोरीला गेले. ‘इंग्लिश पी. ई. एन.’या स्वयंसेवी संस्थेला आर्थिक मदत करण्यासाठी रोलिंग ने एका पोस्ट कार्डवर हॅरी पॉटरची गोष्ट स्वतः ८०० शब्दात लिहून काढली होती. आता ११ वर्षानंतर हे कार्ड विकण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

लेखिका रोलिंगने या संदर्भात पोलिसांना तक्रार केली असून ‘पी. सी. पॉल’ पोलिस ११ वर्षे झाले या कार्डचा तपास करत आहे. हे चोरी करण्याचे काम एका टोळीचे असल्याचे समजते. हे कार्ड हॅरी पॉटरचा खरा प्रशंसकच विकत घेईल, असे ‘पी. सी. पॉल’ ने व्यक्त केले. हे कार्ड कोणी विकत न घेता जर असे कार्ड विकण्यास आले तर आम्हाला खबर द्यावी अशी विनंती पोलिसांनी केली आहे.