Harshvardhan Patil | ‘भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपकडून (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर भाजपकडून कायम या आरोपांचा इन्कार केला जातो. त्यातच आता भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हर्षवर्धन पाटील यांनी दोन वर्षापूर्वी काँग्रेसचा (Congress) हात सोडून कमळ हाती घेतले होते. ‘भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही (No Inquiry), शांत झोप लागते’ असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केले आहे. मावळमधील (Maval) एका कार्यक्रमात त्यांनी गमतीनं हे म्हटलं असलं तरी उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार आल्यापासून सत्ताधारी मंत्री व नेत्यांच्या मागे ईडी (ED), सीबीआय (CBI) व इन्कम टॅक्स (IT) अशा केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. बहुतेक सर्व कारवाया केवळ महाविकास आघाडीशी संबंधित नेत्यांवर होत आहेत. भाजपच्या कोणत्याही व्यक्तीला समन्स धाडलं गेल्याचे किंवा त्यांची चौकशी झाल्याचे मागील दीड वर्षात क्वचितच पाहायला मिळालं आहे. त्यातच हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना एकप्रकारे बळकटी मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांना पक्षांतर करावं लागलं होतं.
हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले.
तर मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) भाजप सोडून राष्ट्रवादीत (NCP) गेले. कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठावर बसलेल्या एका नेत्यांना त्यांनी खासगीत याबाबत विचारलं. आपल्या भाषणात हा किस्सा सांगताना ते म्हणाले, आम्हालाही भाजपमध्ये जावं लागलं. तो निर्णय मी का घेतला तेवढं मला विचारु नका. ते काँग्रेसच्या नेत्यांना विचारा. पण आता भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

हे देखील वाचा

Ranveer Singh | बॉलिवूडचं लव्ह बर्ड ! रणवीर सिंग स्वतःला म्हणतो ‘Husband Of The Century’; जाणून घ्या कारण

Black death | पुन्हा पसरू शकते ’ब्लॅक डेथ’ नावाची महामारी, रशियन डॉक्टरने दिला इशारा

Sameer Wankhede Spying Case | समीर वानखेडे हेरगिरी प्रकरण ! मुंबई पोलीस आयुक्तांनी उचललं ‘हे’ पाऊल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Harshvardhan Patil | no inquiry nothing i am happy with bjp says former minister harshvardhan patil pune news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update