भरधाव ट्रॅक्टरनं तिघांना चिरडलं !

चंदीगड : वृत्तसंस्था – भरधाव ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक ट्रॅक्टर दुभाजकावरून उलटा फिरला आणि थेट रस्ता सोडून फुटपाथवर शिरला. यात तिघे चिरडल्याची घटना (hit-three-people-accident) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा एक थरारक व्हिडीओ (video-viral-on-social-media) समोर आला आहे. हरीयाणातील चरखी दादरी जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे

चरखी दादरी जिल्ह्यातील महेंद्रगड बायपासजवळ रस्त्यावरुन जात असलेल्या एका अनियंत्रित ट्रॅक्टरने तिघांना धडक दिली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमीवर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये पाहिले तर चालकाचे ट्रॅक्टरवरच नियंत्रण सुटल्याने त्याचं चाक डिव्हायरडवर धडकले आणि ट्रॅक्टर दुसरीकडे वळला आणि नियंत्रण मिळवणं कठीण झाल्याने भरधाव ट्रॅक्टरनं तीन जणांना धडक दिली. या शिवाय तिथे दुकानाजवळ असलेल्या एक व्यक्ती देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.