‘हेट स्टोरी 2’ आणि ‘पार्च्ड’ सिनेमातील ‘ही’ अभिनेत्री झाली आई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला हिला कन्यारत्न झालं आहे. 15 एप्रिल रोजी सुरवीनने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सुरवीनने हेट स्टोरी 2 आणि पार्च्ड यांसारख्या सिनेमात आणि काम केले आहे. सेक्रेड गेम्स सारख्या गाजलेल्या वेब सिरीजमध्येही सुरवीन झळकली आहे.

एका मुलाखतीत बोलताना सुरवीन म्हणाली की, “सध्या मला काय वाटतंय हे मी शब्दात मांडू शकत नाही. हा एक वेगळाच अनुभव आहे. मला असं वाटतं की माझ्या कुटुंबावर देवाचा वरदहस्त आहे.” असे ती म्हणाली.

सुरवीन आणि तिच्या नवऱ्याने मिळून तिचे नामकरण केले आहे. ईव असे त्यांनी मुलीचं नाव ठेवले आहे असे समजत आहे. ईव हा इंग्रजी शब्द आहे. ईव या शब्दाचा अर्थ आयुष्याची आई असा होतो.

सुरवीनने तिचे हॉट अंदाजातील फोटोही अनेकदा सोशलवर शेअर केले आहेत.

सुरवीनने गर्भावस्थेत असताना तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सुरवीनने जेव्हा ती आई होणार असल्याचे सांगितले होते तेव्हा ही माहिती तिने इन्स्टावरूनच दिली होती.

सुरवीन अनेकदा तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर करत असते. दोघंही आपल्या जीवनात एकमेकांसोबत फारच आनंदी असल्याचं दिसत आहे.

अक्षय ठाकर असं सुरवीनच्या पतीचं नाव आहे. 2015 साली सुरवीनने अक्षय सोबत विवाहगाठ बांधली. त्यांच्या या लग्नाबाबत कोणालाच कल्पना नव्हती. सुरवीनने कहीं तो होगा या एकता कपूरच्या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिने कसोटी जिंदगीकी या मालिकेतही काम केले होते. प्रेरणा आणि मिस्टर बजाज यांच्या मुलीची भूमिका तिने साकारली होती.