पतंजलीला  धक्का …! आयकर विभागाला तपास करू द्या ,न्यायालयाची ताकीद 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुर्वेदिक आणि खास स्वदेशी उत्पादन देणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली नामक कंपनीला मोठ्ठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बड्या बड्या कंपन्यांना टक्कर देणाऱ्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीच्या बँक खात्यामध्ये अनियमितता आढळल्यामुळे आयकर विभागाला तपास करू द्यावा अशी ताकीद  दिल्ली उच्च न्यायालयाने पतंजलीला दिली आहे.
पतंजली आयुर्वेद लिमिटेड या कंपनीने २०१०-११ च्या दरम्यान आयकर विभागाच्या असेसमेंट प्रक्रियेला न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. आयकर विभाग आपल्या जबाबदाऱ्यांपासून वाचण्यासाठी या प्रकारचा तपास करत आहे, असा युक्तीवाद त्यावेळी पंतजलीने न्यायालयासमोर केला होता.
पतंजलीच्या युक्तीवादावर आयकर विभागाने कंपनीच्या बँक खात्यांमध्ये घोळ असल्यामुळे आम्हाला विशेष तपास करावा लागत आहे, असे उत्तर दिले होते. त्यावर न्यायालयाने असेसमेंट अधिकारी हवा तसा विशेष तपास करू शकतात, असे निर्देश जारी केले. तसेच आयकर विभागाला हवा तो तपास करू द्या, असे न्यायालयाने कंपनीला बजावून सांगितले.
You might also like