IPL 2020 झाला Postpone, आता 29 मार्चला सुरूनाही होणार, BCCI नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2020 च्या कार्यक्रमाची तारीख आणखी वाढविली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, आता ही टूर्नामेंट 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून सुरू होईल. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेची तारीख वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीआय अधिकाऱ्यांनी सांगितले कि, “होय, स्पर्धेच्या पुढे ढकलण्याबाबत अंतर्गत निर्णय घेण्यात आला आहे. आता ही स्पर्धा 15 एप्रिलपासून सुरू होईल. आयपीएलच्या फ्रँचायझी संघांनाही याची माहिती देण्यात आली आहे.

शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जाहीर केले होते की, दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सामन्यांचे आयोजन करता येणार नाही. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, दिल्लीत जेथे लोक जास्त प्रमाणात जमतात तेथे असा कोणताही कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिसोदिया पुढे म्हणाले कि, ‘दिल्लीत होणारे सेमिनार, परिषदा आणि क्रीडा स्पर्धा सध्या होऊ शकणार नाहीत, या सर्व सध्या बंद करण्यात येतील. अश्या कोणत्याही खेळाचे आयोजन जिथे जास्तीत जास्त लोक जमतात त्या सर्वांना बंद करण्यात आले आहे. ज्यात IPL चा समावेश आहे.