Health Benefits Of Avocado | एवोकॅडो सेवनामुळे कमी होतो ‘या’ जीवघेण्या आजाराचा धोका, जाणून घ्या या फळाचे फायदे : अमेरिकन हार्ट असोसिएशनचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Benefits Of Avocado | आरोग्य चांगले राहावे यासाठी सर्व प्रकारच्या फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वे (Vitamins, Antioxidants And Nutrients) असतात. ती गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यास आणि आरोग्य निरोगी (Health Healthy) ठेवण्यास उपयुक्त ठरतात. तसेच, सर्वाधिक घातक समजल्या जाणार्‍या हृदयरोग, कर्करोगासारख्या (Heart Disease, Cancer) आजारांमध्येही अनेक फळे फायदेशीर ठरत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. एवोकॅडो (Avocado) हेही असेच एक फळ आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात, संशोधकांनी या फळाचे वर्णन अनेक जीवघेण्या रोगांपासून संरक्षण करणारे फळ म्हणून केले (Health Benefits Of Avocado).

 

जर आपण आठवड्यातून दोनदा एवोकॅडोचे सेवन केले तर यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. १.१० दशलक्षाहून अधिक सहभागी झालेल्या व्यक्तींवर ३० वर्षे केलेल्या अभ्यासामध्ये एवोकॅडो फळाला संशोधकांनी विशेष औषधी फळ मानले आहे. एवोकॅडो खाण्याचे फायदे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया (Health Benefits Of Avocado).

 

एवोकॅडो हृदय निरोगी ठेवते (Avocado Keeps Heart Healthy) –
एवोकॅडोचे नियमित सेवन विशेषतः आरोग्यासाठी उपयुक्त आहे. आठवड्यातून किमान दोन वेळा हे फळ खाल्ल्यास हृदयरोगाचा धोका इतरांपेक्षा कमी असू शकतो.

 

अभ्यासात असे आढळले आहे की एवोकॅडो फळ हे परिपूर्ण खाद्य आहे. त्यामुळे आपली अतिरिक्त खाण्याची इच्छा कमी होते. परिणामी वजन नियंत्रित (Weight Control) ठेवण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतं.

एवोकॅडो हृदयासाठीही फायदेशीर (Avocado Is Good For Heart) –
३० वर्षांहून अधिक काळ केलेल्या या अभ्यासात ६८,७८० पेक्षा जास्त महिला आणि ३०-५५ वयोगटातील ४१,७०० पेक्षा जास्त पुरुषांचा सहभाग होता. सर्व सहभागी झालेले अमेरिकेचे रहिवासी होते आणि अभ्यासाच्या सुरूवातीस हे सर्व रोगमुक्त होते. अभ्यासानुसार या सहभागींमध्ये कोरोनरी हृदयरोगाची (Coronary Heart Disease) ९,१८५ जणांना आणि स्ट्रोकची (Stroke) ५,२९० जणांना लक्षणांची नोंद झाली आहे. संशोधनाच्या निष्कर्षात, तज्ज्ञांना असे आढळले आहे की आठवड्यातून दोनदाही एवोकॅडोचे सेवन करणार्‍या सहभागी व्यक्तींना हृदयाशी संबंधित विविध समस्यांचा धोका कमी असल्याचे आढळले.

 

एवोकॅडो फळाचे फायदे (Benefits Of Avocado Fruit) –
हे फळ परिपूर्ण आहार तर आहेच शिवाय हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी (Heart And Blood Vessels) रोगांच्या प्रतिबंधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, असे हार्वर्ड टी. एच. चेन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे (Harvard T. H. Chain School of Public Health) प्राध्यापक आणि अभ्यासाचे मुख्य लेखक लोरेना एस. पाचेको (Lorena S. Pacheco) म्हणतात. एवोकॅडोसारखी फळे याचे उत्तम उदाहरण मानता येतील. अमेरिकेत अ‍ॅव्होकॅडोचा वापर गेल्या २० वर्षांत वेगाने वाढला आहे. प्रत्येकाने त्याचा आहारात समावेश करावा, असे हे गुणकारी फळ आहे.

अनेक गंभीर आजारातही संरक्षण (Protection Against Many Serious Illnesses) –
एवोकॅडोच्या सेवनाने जगभरात वेगाने वाढणार्‍या हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
एवोकॅडोमध्ये फायबर, असंतृप्त चरबी, विशेषत: मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स (Monounsaturated Fats) (निरोगी चरबी) आणि इतर अनुकूल घटक असतात.
क्लिनिकल चाचण्यांमध्ये असे आढळले आहे की उच्च कोलेस्ट्रॉलसह हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारातही एवोकॅडो उपयुक्त आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Benefits Of Avocado | avocado health benefits for heart american heart association recommends
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Level Control | डायबिटीजच्या रूग्णांनी सकाळी ब्रश करण्यापूर्वी चघळावीत ‘ही’ पाने, ब्लड शुगर नेहमी राहील कंट्रोल

 

Health Tips | कडू कारल्याची भाजी खाण्याचे 5 गोड फायदे कोणते?; जाणून घ्या 

 

Benefits Of Milk With Gulkand | उन्हाळ्यात दुधासोबत मिसळून प्या ‘हा’ पदार्थ; एकदम आराम वाटेल, जाणून घ्या