Health Tips | कडू कारल्याची भाजी खाण्याचे 5 गोड फायदे कोणते?; जाणून घ्या

0
247
Health Tips | bitter gourd must be in diet while caring health5 benefits of eating bitter gourd
File Photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | माणसाचे आरोग्य खाण्यापिण्यावर अवलंबून असते. मात्र महत्वाचे म्हणजे त्यामध्ये योग्य आहार (Proper Diet) असणे हेही गरजेचे आहे. आहारामध्ये वेगवेगळ्या भाज्या असणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे (Health Tips). महत्वाचे म्हणजे प्रत्येक भाजीला आहारात महत्व द्यायला हवे. सर्व भाज्या प्रमाणे हाच न्याय कारल्याच्या (Bitter Gourd) भाजीला देखील लावायला हवा. कारण कारल्यामध्ये अनेक फायदे (Bitter Gourd Health Benefits) आहेत.

 

कारल्याची भाजी आठवड्यातून 1 ते 2 वेळा खायलाच हवी असं आहार तज्ज्ञ सांगतात. कारल्यामुळे पचन यंत्रणा सुधारते, भूक सुधारते. पोटदुखी, ताप, डोळ्यांचे विकार यावर कारलं औषधी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. महत्वाचे म्हणजे कारल्याच्या भाजीमध्ये अ, ब, क जीवनसत्व (Vitamins A, B, C.) असतात. तसेच, केरोटीन, बीटाकेरोटीन, लूटीन, लोह, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीजसारखे (Carotene, Beta-Carotene, Lutein, Iron, Zinc, Potassium, Magnesium And Magnesium) आरोग्यास उपयुक्त घटक असतात. (Health Tips)

 

कारल्याची भाजी खाण्याचे 5 फायदे (5 Benefits Of Eating Bitter Gourd Vegetable) –

कारल्याचा भाजी अथवा ज्यूसचा स्वरुपामध्ये आहारात समावेश करायला हवा. कारल्यामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म (Anti-Diabetic Properties) असल्याने मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आणि मधुमेह असल्यास त्याची तीव्रता कमी करण्यासाठी कारल्याचा उपयोग होतो.

 

वजन कमी करण्यासाठी (Bitter Gourd For Weight Loss) कारल्याची भाजी उपयुक्त असते. कारल्याच्या भाजीतल्या गुणधर्मांमुळे वजन कमी होते अथवा नियंत्रित ठेवले जाते.

 

कारल्यामधे फ्लेवोनाॅइडस हे ॲण्टिऑक्सिडण्ट (Antioxidant) गुणधर्म असतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी कारलं खाणं महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार कॅन्सरच्या उपचारामध्ये कारल्याचा समावेश केलेला असतो.

 

कारलं सेवन केल्यामुळे यकृतातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
फॅटी लिव्हरसारख्या समस्यातही कारलं सेवन करणे फायदेशीर मानलं जाते.

 

कोलेस्टेरॉल (Cholesterol) वाढल्याने हृदय विकाराचा धोका संभवतो.
हा धोका कमी करण्यासाठी कारलं खाणं आवश्यक असल्याचं आहार तज्ज्ञ सांगतात.
कारल्यात शरीरातील बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं.
नियमित आहारात कारल्याचा समावेश असल्यास कोलेस्टेराॅल नियंत्रणात राहातं.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Tips | bitter gourd must be in diet while caring health5 benefits of eating bitter gourd

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा