‘या’ आजारांवर उपयुक्त आहे गवार ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गवारीची भाजी अनेकांना आवडत नाही. पण ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या भाजीच्या सेवनाने आपले अनेक आजार नियंत्रणात येतात. गवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आढळून येतात.

या व्यतिरिक्त यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल किंवा वसा आढळून येत नाही. गवारीला जबरदस्त टॉनिक मानले जाते. गवारीची भाजी खाल्यावर आपले कोणते आजार नियंत्रणात येतात. याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

१) गवारीच्या पानांचा चार चमचे रस आणि लसणाच्या ३-४ कुड्यांचा रस एकत्र करून हे मिश्रण डाग, खाज असलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळेल.

२) कच्ची गवार बारीक करून यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबिर टाकून चटणी तयार करून घ्यावी. दररोज या चटणीचे सेवन केल्यास डोळ्यांची शक्ती वाढते.

३) गवारीची अर्धीकच्ची भाजी आरोग्यासाठी सहायक मानली जाते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार, ही भाजी हृदय रुग्णांसाठी उत्तम आहे. आधुनिक विज्ञानानेसुद्धा गवारीमध्ये आढळून येणाऱ्या फायबरला कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवण्यासाठी उत्तम मानले आहे.

४) गवारीला पाण्यामध्ये उकळून याचा रस दमा असलेल्या रुग्णाला दिल्यास लाभ होतो. आदिवासी लोक दमा रुग्णांना गवारीच्या शेंगा कच्च्या खाण्याचा सल्ला देतात.

५) पातळकोट येथील आदिवासी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गवारीच्या शेंगामधील बिया रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवून दुसऱ्या दिवशी या बिया बारीक करून सूज, सांधेदुखी, भाजलेल्या ठिकाणी लावल्यास लवकर आराम मिळतो.

Loading...
You might also like