डायनिंग टेबलवर नव्हेतर जमीनीवर बसून जेवण केल्यास होतील ‘हे’ 6 फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – जॉईंट फॅमिली आणि घराचे सामायिक छत जेव्हापासून संपुष्टात आले आहे, तेव्हापासून लोकांची जीवनशैली खुपच बदलली आहे. पूर्वी लोक जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासाठी देत असत. जेवण सुद्धा सर्वजण एकत्र जमीनीवर बसून जेवत असत. यामुळे त्यांचे नाते मजबूत होत असे, आणि आरोग्य सुद्धा चांगले राहात असे.

काळ बदलला तसे लोक डायनिंग टेबलवर बसून जेवू लागले. अशा सवयींमुळे लोकांच्या आरोग्याचे खुप नुकसान होत आहे, मात्र त्यांना हे समजून येत नाही. जाणून घेवूयात जमीनवर बसून जेवण्याचे कोणते फायदे आहेत…

हे आहेत फायदे

1 पोटाच्या मांसपेशींवर दबाव पडतो, ज्यामुळे अन्नाचे पचन होते.

2 पोटाच्या समस्या होत नाहीत.

3 शरीराच्या प्रत्येक भागात योग्य प्रमाणात रक्तसंचार होतो.

4 गुडघे मजबूत होतात आणि त्यांच्यामध्ये लवचिकपणा येतो.

5 लठ्ठपणापासून सुटका होऊ शकते. बसून खाल्ल्याने पोटावर दबाव येतो, ज्यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त खात नाही.

6 बसून खाल्ल्याने पोटाचा घेर वाढत नाही.