×
Homeआरोग्यHealth Care Tips | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही खाऊ नयेत या 4 भाज्या,...

Health Care Tips | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही खाऊ नयेत या 4 भाज्या, होऊ शकते आरोग्याचे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Care Tips | भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स (Vitamins, Minerals and Anti-Oxidants) आढळतात. परंतु, प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वकाही चांगले नसते. त्याचप्रमाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी काही भाज्या खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मधुमेहाच्या रुग्णांनी (Diabetic Patients) कोणत्या भाज्या आपल्या आहारात समाविष्ट करू नयेत ते जाणून घेवूया. (Health Care Tips)

 

1. बटाट्यापासून दूर ठेवा –
बटाट्याचे (Potato) सेवन मधुमेही रुग्णांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. त्यात भरपूर स्टार्च आढळते, याचा अर्थ बटाट्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. भाजलेल्या बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 111 असतो, तर उकडलेल्या बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 82 असतो, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णाचे खूप नुकसान होते.

 

2. मक्याचे कणीस खाऊ नका
(Maize corn) कॉर्नचा ग्लायसेमिक इंडेक्स 52 आहे, परंतु फायबर रिच फूडमध्ये त्याची गणना केली जात नाही, ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकते. तरीही, जर तुम्हाला ते खायचे असेल तर ते हाय फायबर फूडसोबत खा. (Health Care Tips)

3. मटार खाणे टाळावे
मटारमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट आढळतात, म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना हानी पोहोचवू शकते. मटारचा (Peas) ग्लायसेमिक इंडेक्स 51 आहे. मधुमेहामध्ये मटार खाणे टाळा किंवा मर्यादित प्रमाणात खा.

 

4. व्हेजिटेबल ज्यूस पिऊ नका
हिरव्या भाज्यांचा ज्यूस आरोग्यासाठी खूप फायदेशीर असला तरी या ज्यूसमध्ये फायबरची कमतरता असते. त्यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा चांगला पर्याय नाही. फायबर ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Level Control, ) ठेवण्यास मदत करते. व्हेजिटेबल ज्यूस (Vegetable juice) पिण्याऐवजी त्यांचा आहारात समावेश केला तर चांगले ठरेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Care Tips | vegetables not to eat in diabetes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | ‘मोदी एजंट बनलेल्या राज्यपालांनी महाराष्ट्रातून लवकर काढता पाय घ्यावा’

 

Pune Crime | पुण्यात पेट्रोल पंपाच्या डिलरशिप देण्याच्या बहाण्याने 42 लाखांची फसवणूक

 

Pune PMC News | केशवनगर येथे गोठ्यांसाठी दिलेल्या जागेचा बेकायदेशीररित्या व्यावसायीक वापर ! बोगस पुराव्यांच्या आधारे जागा मिळवून देणार्‍या ‘दलालांचा’ सुळसुळाट

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News