Coronavirus : कोलकाताच्या 14 टक्के लोकांमध्ये COVID-19 अँटीबॉडी : ICMR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता भारत चांगल्या स्थितीत आहे. येथे कोरोना जसा पसरत आहे, तसा बरा सुद्धा होत आहे. आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने ‘सीरोप्रीव्हेलन्स’ सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये दिसून आले आहे की, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या 14 टक्के लोकांमध्ये कोविड-19च्या अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत. सीरोप्रीव्हेलन्स सर्वेक्षणमध्ये लोकांची त्वरीत तपासणी करून त्यांच्यामध्ये असलेल्या आयजीएम आणि आयजीजी अँटीबॉडीचा शोध घेतला जातो, तसेच समुदायात संक्रमणाचा स्तर किती आहे आणि त्यांच्यात व्हायरसची प्रतिरोधक क्षमता विकसित होत आहे का, ही माहिती यातून मिळते.

आयसीएमआरने हे सर्वेक्षण नमूण्यांच्या आधारावर केले आहे आणि नमुण्यांच्या संख्येची माहिती दिलेली नाही. वरिष्ठ डॉक्टरांच्यानुसार, सर्वेक्षण सांगते की, महानगरात संक्रमणाचा दर खुप जास्त आहे आणि कोविड-19 ला तोंड देण्यासाठी प्रतिरोधक क्षमता आणि अँटीबॉडी विकास अजूनही होत नाही.

सर्वेक्षणानुसार, शेजारच्या दक्षिण 24 जिल्ह्यात अँटीबॉडी विकसित होण्याचा दर 2.5 टक्के आहे, तर अलीपुरद्वार जिल्ह्यात हा दर एक टक्का आहे. सर्वेक्षणानुसार, पूर्व मेदिनीपुर, बांकुड़ा आणि झारग्राम जिल्ह्यात अँटीबॉडी तपासणीत एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी नमणे पॉझिटिव्ह आले. उल्लेखनीय आहे की, पश्चिम बंगालमध्ये कोविड-19 च्या एकुण संक्रमितांची संख्या वाढून 17,283 झाली आहे. महामारीमुळे जीव गमावणार्‍यांची संख्या वाढून 639 झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like