Health Department Exam Paper Leak Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! 20 आरोपींवर न्यायालयात 3816 पानांचे दोषारोपपत्र

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Health Department Exam Paper Leak Case | आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील पदाच्या निवडची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार होती. मात्र, या परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फोडण्यात आला. प्रश्न पत्रिकेमधील 100 पैकी 92 प्रश्न व त्यांची उत्तरे लिखित स्वरुपात व्हायरल करण्यात आली. याप्रकरणी (Health Department Exam Paper Leak Case) पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) 20 जणांना अटक (Arrest) केली आहे. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध 3816 पानांचे दोषारोपपत्र (Charge sheet) न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी (Health Department Exam Paper Leak Case) पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. आरोपींनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे प्रसारीत करुन शासनाची व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक (Cheating) केली. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

विजय प्रल्हाद मुऱ्हाडे (वय-29 रा. नांदी, ता. अंबड, जि. जालना), अनिल दगडू गायकवाड (वय-31 रा. किनगाव वाडी, जि. जालना), सुरेश रमेश जगताप (वय 28 रा. बोल्हेगाव, जि. जालना), बबन बाजीराव मुंढे (वय-48 रा. पळसखेड झालटा, जि. बुलडाणा), संदीप शामराव भुतेकर (वय- 38 रा. भाग्योदय नगर, औरंगाबाद), प्रकाश दिगंबर मिसाळ (वय-40 रा. ढोरकपोस्ट जि. बीड सध्या रा. वराळे ता. मावळ जि. पुणे), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय-36 रा. तिंतरवणे जि. बीड), प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय-50 रा. आंबेजोगाई), डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय-36 रा. आंबेजोगाई), शाम महादू मस्के (वय-38  रा. आंबेजोगाई), राजेंद्र पांडूरंग सानप (वय-51 रा. शामनगर, बीड),

महेश सत्यवान बोटले (वय-53 रा. मुलूंड (पश्चिम) मुंबई), नामदेव विक्रम करांडे (वय-33 रा. गयानगर, बीड), उमेश वसंत मोहीते (वय-24 रा. बलसूर ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), अजय नंदू चव्हाण (वय-32 रा. औरंगाबाद), कृष्णा शिवाजी जाधव (वय-33 बीड बायपास रोड, औरंगाबाद), अंकीत संतोष चनखोरे (वय-23 रा. काल्डा कॉर्नर, औरंगाबाद), संजय शाहूराव सानप (वय-40 रा. वडझरी, बीड), आनंद भारत डोंगरे (वय-27 रा. भेकराई नगर, फुरसुंगी, पुणे मुळ. रा. शेटफळ ता. माढा, जि. सोलापूर), अर्जुन भरत बमनावत उर्फ रजपुत (वय-30 रा. हर्सुल, औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पुणे सायबर पोलिसांना (Pune Cyber Police) जप्त केलेल्या साधनांमधून सबळ पुरावा मिळाला आहे. त्यामुळे आरोपींविरुद्ध 3816 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात गुरुवारी (दि.24) दाखल करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
आर्थिक व सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke),
सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule)
यांच्या मार्गदर्शनाखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके (Senior Inspector of Police D.S. Hake),
पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील  (Police Inspector Minal Supe-Patil) यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Health Department Exam Paper Leak Case | 3816 pages chargesheet in court against 20 accused

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1182 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Nandurbar Police | अपघातात मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाला नंदुरबार पोलिसांकडून 6.5 लाखाची मदत,
11 लाख 46 हजार 948 रुपयांचे जप्त केलेले 110 मोबाईल मूळ मालकांना IG बी.जी. शेखर पाटील यांच्याहस्ते सुपुर्द

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 25 हजार रोख आणि पोलीस चौकीसाठी प्रिंटरची लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर FIR; पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ