कोरोना काळात मानसिकदृष्ट्या ‘निरोगी’ राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ 9 सोप्या टिप्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना काळात मानसिकदृष्या निरोगी राहणे खुप आवश्यक आहे. यासाठी आतून स्ट्राँग झाले पाहिजे. तुम्हाला सुद्धा कोरोना काळात मानसिकदृष्या निरोगी राहायचे असेल तर या टिप्स आवश्य फॉलो करा –

1. हातात सूत्र घ्या
संयम, साहस, मूल्यांकन, संबंध, समीक्षा, विश्रांती आदीबाबत विचार करण्यासाठी पत्नीकडे किंवा स्वताकडे सूत्र घ्या.

2. द्रव पदार्थ, जेवण, औषध वेळेवर घ्या
वेळेवर इलेक्ट्रॉल, ओआरएस, ज्यूस इत्यादी द्रव पदार्थ घेत रहा. जेवण, औषध वेळेवर घ्या.

3. या गोष्टींचे मुल्यांकन करा
संक्रमित होताच पैशांची उपलब्धता, आपल्या भागातील वैद्यकीय सुविधा, मित्रांची व्यस्तता, नातेवाईकांची गरज आणि स्वताचे सामर्थ्य यांचे व्यवस्थित मुल्यांकन करा.

4. धैर्याने काम घ्या
आजारी पडताच हात-पाय गाळून बसू नका. सर्वांना आपली समस्या सांगत बसल्यावर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास निराशा हाती येते आणि संतुलन बिघडते. यासाठी धैर्याने वाटचाल करा, ज्याची आवश्यकता आहे त्याच्याशीच बोला.

5. जोडीदाराचे महत्व जाणून घ्या
सर्व निर्णय स्वताच न घेता जोडीदाराला सहभागी करून घ्या. चांगली रणनिती बनवा. जर पत्नीपेक्षा मित्राची आवश्यकता असेल तर त्यांचा विचार घ्या. तुम्ही आजारी असाल तर पत्नीकडे सूत्र द्या.

6. स्लो अँड स्टेडी विन्स द मॅच
नेहमी लक्षात ठेवा, युद्ध आणि आजारात तेच जिंकतात, जे जास्तीत जास्त वेळ सुरक्षित राहून पुढे वाटचाल करतात. जास्त गंभीर स्थितीत जास्त सांभाळून निर्णय घ्या.

7. कुणाचे ऐकायचे ते ठरवा
कुणाच्याही सांगण्यावरून जोखीम घेवू नका. चुकीचे एक पाऊल तुमचा संयम, पैसा आणि सामंजस्य बिघडवू शकते. कुणाच्या सांगण्यावरून डॉक्टर, औषध किंवा इतर कोणतीही व्यवस्था बदलू नका.

8. मजबूत आधार नंतर आक्रमक प्रहार
जेव्हा तुम्हाला वाटेल की, तुम्ही धोक्याच्या बाहेर आहात तेव्हा आक्रमकतेवर जोर द्या. हे सर्व कसे आणि कशाप्रकारे लवकर संपवायचे आहे यावर विचार करा, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर आजारी मानसिकतेतून बाहेर पडाल. घरात उत्साहाचे क्षण निर्माण करा, ज्यामुळे इतर सदस्यांचा विश्वास वाढेल.

9. दूसरी खेळी खुप आवश्यक
आजारातून बाहेर पडल्यानंतर काही काळापर्यंत आपले आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची चिंता आवश्य करा. आरोग्य केवळ औषधांनी मिळत नाही तर घरातील उदास वातावरण दूर करण्याने सुद्धा मिळते.