Herbal Leaves Benefits : शुगर कंट्रोल करायची असेल तर तुळस, कडूलिंब आणि कडीपत्त्याचे करा सेवन, जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शुगर आणि ब्लडप्रेशर लाईफस्टाइलमुळे होणारे आजार आहेत. सध्या या आजाराचे प्रमाण सर्वच वयोगटात प्रचंड वाढले आहे. औषधाशिवाय तुम्ही भरपूर औषधी गुणधर्म असलेली तुळस, कडूलिंब आणि कडीपत्त्याचे सेवन करून सुद्धा ब्लड प्रेशर आणि शुगरला कंट्रोल करू शकता. कशा प्रकारे ही पाने शुगर आणि ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यात परिणामकारक आहेत ते जाणून घेवूयात…

तुळशीच्या पानांचे करा सेवन :
तुळशीला वनस्पतींची राणी म्हटले जाते. ती आजारांपासून आपल्या शरीराचे रक्षण करते. अनेक संशोधनात सांगण्यात आले आहे की, रिकाम्यापोटी तुळशीची पाने सेवन केल्याने टाईप 2 डायबिटीजने पीडित लोकांच्या रक्तातील साखरेचा स्तर कमी होतो. तुळशीच्या पानांचा वापर ब्लड प्रेशर कमी करणे आणि हृदयरोगापासून वाचण्यासाठी परिणामकारक आहे.

कडूलिंबाच्या पानांचे करा सेवन :
कडूलिंबाची पाने आरोग्यासाठी खुप लाभदायक आहेत. असे अनेक पुरावे आहेत जे सांगतात की, कडूलिंबाच्या पानांचा वापर रोज केल्यास ब्लड शुगरचा स्तर कमी होतो. लिंबाच्या पानांचा एंटीहिस्टामाईन प्रभाव रक्त वाहिन्यांना पातळ करू शकतो. याच कारणामुळे लिंबाची पाने ब्लड प्रेशर कमी करण्यात मदत करतात. जर डायबिटीज असेल तर नियमित आपले ब्लडप्रेशर चेक करा, कारण लिंबाच्या पानांच्या सेवनाने तुमच्या शुगरचा स्तर खुपच कमी सुद्धा होऊ शकतो. अशावेळी शुगरचे औषध कमी करण्याची आवश्यकता असू शकते. एक महिन्यापर्यंत लिंबाच्या पानांचा अर्क किंवा कॅप्सूल घेतल्यास उच्च कोलेस्ट्रॉलचा स्तर सुद्धा कमी होऊ शकतो.

कडीपत्त्याचे करा सेवन :
कडीपत्त्याचा वापर भारतीय खाद्यपदार्थांमध्ये जास्त केला जातो. यामुळे तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहू शकते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कडीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने इन्सुलिन बनवणार्‍या पेशींना स्ट्युमिलेट करण्यात मदत मिळते. या पेशी रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित करण्यात मदत करतात.