COVID-19 Vaccine : जाणून घ्या, वॅक्सीनचं परिक्षण मनुष्यावर ‘कसं’ आणि ‘किती’ दिवसांमध्ये केलं जातं

दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारी दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून एक चांगली बातमी मिळत आहे. वृत्तानुसार, कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) कोवॅक्सीन आणि जायकोव्ह-डी या कोरोना विषाणूच्या लसीच्या मानवी चाचण्यांना मान्यता दिली आहे. यामुळे लोकांमध्ये आशेचा किरण वाढला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयावर प्रसिद्ध झालेल्या लेखात असा दावा केला गेला आहे की, ही लस कोरोना विषाणूला मुळापासून बरी करू शकते. चला जाणून घेऊया की, लसीची मानवावर कशी चाचणी केली जाते आणि किती वेळ लागतो…

Mumps वॅक्सीन तयार करण्यात लागली होती चार वर्षे
लस चाचणीस बराच वेळ लागतो, पण आपत्कालीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्यास संशोधनास गती मिळते. जर इतिहास पाहिला, तर लक्षात येईल की mumps साठी सर्वात वेगवान लस तयार केली गेली होती. ही लस तयार करण्यास चार वर्षे लागली होती. एखादी लस तयात होण्यास आणि तिची मानवी चाचणी करण्यासाठी आर अँड डी (रिसर्च आणि डेव्हलपमेंट) केले जाते.

जेव्हा आर अँड डी प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा तयार केलेल्या लसीची चाचणी प्राणी व वनस्पतींवर केली जाते. ही लस कशी कार्य करते आणि त्याचा परिणाम कसा मिळू शकतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. जर लसीची प्रतिक्रिया नकारात्मक असेल, तर ती बर्‍याच काळासाठी संशोधनाचा विषय बनते.

सकारात्मक असल्यास लस क्लिनिकल चाचणीसाठी पाठवली जाते. पुढच्या टप्प्यात लसीची मानवी चाचणी केली जाते. त्याला पाच ते सात वर्षे लागतात. चाचणी प्रक्रिया तीव्र असतानाही कमीतकमी एक ते दीड वर्षे लागतात.

मानवी चाचणीचे तीन टप्पे असतात
पहिल्या टप्प्यात लोकांच्या निवडक गटावर ही लस वापरली जाते. लसीद्वारे व्यक्तीच्या शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. या प्रक्रियेस ९० दिवस लागतात.

तर दुसर्‍या टप्प्यात लस जास्त लोकांवर वापरली जाते. या प्रक्रियेस १८०-२४० दिवस लागतात. या टप्प्यात औषधाचा रोगावर किती परिणाम होतो हे पाहिले जाते. यासंदर्भात खबरदारी देखील घेतली जाते, जेणेकरून प्रतिकूल प्रतिक्रिया येऊ नये. मात्र कोरोना महामारीमध्ये परिक्षणाची वेळ कमी करण्यात आली आहे.

अंतिम टप्प्यात हजारो लोकांवर एकाच वेळी लस वापरली जाते. यावेळी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत किंवा जास्त असल्यास ही लस कशी कार्य करते याची तपासणी केली जाते. या प्रक्रियेत सुमारे २००-२४० दिवस लागतात. जेव्हा लस अंतिम टप्प्यातही यशस्वी होते, तेव्हा ती रेग्युलर रिव्यूसाठी पाठवली जाते. या प्रक्रियेमध्ये यशस्वी झाल्यानंतर लसीचे उत्पादन केले जाते.