‘बॅलेरीना’ चहा आरोग्य आणि स्वादासाठी ‘अतुलनिय’, जाणून घ्या ‘हे’ 3 फायदे

दिल्ली : भारतातील प्रत्येक घरात दिवसाची सुरूवात चहाने होते. लोक तो मोठ्या चवीने रोज पितात. काही लोकांना दूधाचा चहा आवडतो. तर काही लोक पोटाच्या समस्यांसाठी लिंबूचा चहा घेतात. तर काही लोक वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. यासोबतच बॅलेरीना चहाचे सेवनसुद्धा तुम्ही करू शकता.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बॅलेरीना चहाच्या सेवनाने वाढते वजन नियंत्रित करता येते. यामध्ये लेक्सटिव्ह, अँटी-ऑक्सिडेंट आणि फ्लॅवोनॉईड्सचे गुण आढळतात. ज्यांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जर तुम्हाला बॅलेरीना टी बाबत माहित नसेल तर, जाणून घेवूयात…

बॅलेरीना चहा असा तयार करा
बॅलेरीना चहा दालचीनी आणि लिंबूचा वापर करून बनवला जातो. यामध्ये सुकवलेली चायनीज मालवा फळे आणि सोनामुखीचे सुद्धा मिश्रण असते. बॅलेरीना चहा एक हर्बल चहा आहे. यामध्ये कॅफीन आढळत नाही. बॅलेरीना चहा तुम्ही कधीही पिऊ शकता.

1 वजन कमी करण्यासाठी लाभदायक
जाणकारांमध्ये बॅलेरीना चहाबाबत मतभेद आहेत. काही जाणकारांचे म्हणणे आहे की, बॅलेरीना चहा प्यायल्याने वजन कमी होते. तर, काही जाणकारांचे म्हणणे आहे की, हे सिद्ध नाही की याच्या सेवनाने वजन घटते. मात्र, या चहाच्या सेवनाने फॅट निश्चितपणे बर्न होते, जे वजन कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी बॅलेरीना चहा पित असाल तर एकदा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

2 ह्रदयरोगात लाभदायक
बॅलेरीना चहामध्ये फ्लेवोनॉइड आढळते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि सायंकाळी बॅलेरीना चहाचे सेवन करू शकता.

3 कॅफीन फ्री
यामध्ये कॅफीन अजिबात नाही. हा चहा तुम्ही कोणत्याही वेळी पिऊ शकता. याच्यामुळे तणाव आणि निद्रानाशाची समस्या नियंत्रित होते, असेही म्हटले जाते.