रात्री चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ ! जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आपण अनेकदा ऐकत असतो की, रात्री झोपताना सकस आणि हलका आहार घ्यावा. परंतु याकडे फरसं कुणी लक्ष देत नाही. काहींना तर हेही समजत नाही नेमके कोणते पदार्थ रात्री झोपताना खाणं टाळलं पाहिजे. आज आपण याबद्दलच माहिती घेणार आहोत.

1) भात – रात्री झोपताना भात खाल्ला तर शरीरात अतिरीक्त चरबी जमा होण्याची शक्यता असते. खास करून पोटाकडील चरबीवर याचा जास्त परिणाम होतो.

2) फास्ट फूड/तेलकट पदार्थ – तळलेले पदार्थ आणि पिझ्झा, बर्गर, फ्राईज असं फास्ट फूड रात्री खाणं टाळायला पाहिजे. अपचन आणि अॅसिडीटीमुळं निद्रानाश होऊ शकतो.

3) चॉकलेट – तुम्हाला चॉकलेट कितीही आवडत असेल तरीही रात्री झोपताना ते खाऊ नका. कारण त्यातही काही प्रमाणात कॅफेन असतं. त्यामुळं त्याचा झोपेवर परिणाम होऊ शकतो.

4) मांसाहारी पदार्थ – रात्री मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. कारण मांस पचण्यासाठी 24 ते 72 तासांचा वेळ लागतो. यामुळं वजन तर वाढतंच, सोबतच रात्री अपचनामुळं झोपंही मोड होऊ शकते.

5) चायनीज पदार्थ – चायनीजमध्ये एमएसजी अर्थात मोनोसोडियम ग्लुटामेट असतं. आरोग्याच्या दृष्टीनं तो घातक आहेच, त्यामुळं निद्रानाश होऊ शकतो.

…म्हणून रात्री हलका आहार घ्यावा

रात्री जेवल्यानंतर 2 तासात आपण झोपतो. यावेळी आपली पचनक्रिया मंदावते. अशात हलका आहार फायद्याचा ठरतो. अनेक पदार्थ हे पचायला जड असतात. म्हणून रात्री कमी खाण्याचा सल्लाही दिला जातो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.