रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘हरभरा’चं पाणी, आरोग्याला होतील अनेक फायदे

पोलीसनामा ऑनलाईन : हरभरा पौष्टिक आणि ऊर्जा देणारे धान्य आहे. म्हणून, ते अनेक प्रकारे भारतीय स्वयंपाकात शिजवले आणि सर्व्ह केले जाते. लोक हरभऱ्याची भाजी, चाट आणि त्याला मोड आलेले धान्य सॅलेडच्या स्वरूपात खातात. परंतु हरभरा खाण्याबरोबरच त्याचे पाणी पिण्यामुळे आरोग्यासाठी बरेच फायदे होऊ शकतात. जर पाण्यात हरभरा भिजवून ते पाणी पिल्यास आपली रोग प्रतिकारक्षमता वाढते.

दरम्यान हरभरामध्ये आढळणारे पौष्टिक घटक जसे कि फायबर, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके, जीवनसत्त्वे तसेच हेल्दी फॅट आणि लोह इत्यादी भिजण्यासाठी वापरलेल्या पाण्यात मिसळून जातात. ज्यामुळे हे पाणी पोषणने समृद्ध बनते. या सर्व पोषक गोष्टींमुळे शरीराला फायदा होतो. त्यातील एक म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मजबूत होणे. जाणून घेऊया हरभऱ्याचे पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे –

भिजलेल्या हरभऱ्याचे पाणी पिल्याने रोग होतात दूर
या दिवसात प्रत्येकाचे समान उद्दीष्ट आहे, ते म्हणजे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविणे. जेणेकरुन, कोरोना विषाणूचा धोका टाळता येईल. यासाठी हरभरा पाणी प्या. ते पिल्याने प्रतिकारशक्ती वाढते. हरभऱ्याच्या मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. याव्यतिरिक्त, या धान्यात क्लोरोफिल आणि फॉस्फरस देखील आहे. हे खनिजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून जेव्हा जेव्हा हरभरा किव्हा छोले भिजवालं किंवा उकळालं तेव्हा पाणी फेकण्याऐवजी प्या.

पचनक्रिया सुधारते
निरोगी शरीरासाठी पोट निरोगी राहणे महत्वाचे आहे. कारण, पचनक्रिया म्हणजेच पाचन तंत्राशी संबंधित त्रास हे बर्‍याच रोगांचे कारण आहेत. हरभरा पाणी पिल्याने बद्धकोष्ठता, पोटदुखी, सूज येणे, अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. पचनक्रिया ठीक करण्यासाठी हरभरा रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. यामुळे, पोटाच्या समस्येपासून हळूहळू आराम मिळेल.

असेही करू शकता हरभऱ्याच्या पाण्याचे सेवन
– चवीसाठी भिजलेली हरभरे मीठ टाकून उकळवा. नंतर, ते गाळून पाणी प्या.
– सूप किंवा डाळ बनवताना हे पाणी वापरा.
– चाट मसाला, काल मीठ, लिंबाचा रस आणि पुदीनाची पाने हरभरा पाण्यात मिसळून हेल्दी पेय तयार करा.