Health Tips – Reheating Food | ‘हे’ 5 पदार्थ पुन्हा गरम करण्याची करू नका चूक, शरीर होईल अशक्त…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | आपण सगळेच उरलेले अन्न पुन्हा गरम करून खातो (Health Tips – Reheating Food). हे करणे सोयीचे आहे. कारण याने अन्नाची नासाडी होत नाही. परंतु शिळे अन्न पुन्हा गरम करणे, हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. काही पदार्थ खाण्यापूर्वी पुन्हा गरम करू नयेत, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते (Health Tips – Reheating Food).

  • बटाटा (Potato)-

क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचा बॅक्टेरिया बटाट्यामध्ये वाढू शकतो. ज्यामुळे अन्नात विषबाधा होऊ शकते. याशिवाय बटाट्यामध्ये असलेले पोषक तत्व (Nutrients) पुन्हा गरम केल्याने नष्ट होतात.

  • पालेभाज्या (Leafy Vegetables) –

पालेभाज्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. पुन्हा गरम केल्यावर नायट्रेटचे नायट्राइटमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे कर्करोग (Cancer) होऊ शकतो.

  • तांदूळ (Rice) –

तांदळात स्टार्च असते. हे स्टार्च पुन्हा गरम केल्यावर त्याचे ग्लूटेनमध्ये रूपांतर होते, ज्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो.

  • मांसाहारी पदार्थ (Non-Vegetarian Food) –

मांसामध्ये प्रथिने आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. हे पुन्हा गरम केल्यावर, प्रथिने आणि चरबी तुटतात आणि विषारी पदार्थांमध्ये बदलतात, ज्यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात.

  • मशरूम (Mushrooms) –

मशरूममध्ये प्रथिने (Protein) आणि खनिजे (Minerals) प्रमाणात जास्त असतात. ते पुन्हा गरम केल्यावर, प्रथिन्यांत रूपांतर विषारी पदार्थांत (Toxins Food) होते. ज्यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

एनडीए मधील रेजिमेंटल क्लार्क कडून 11 लाखांचा अपहार, गुन्हा दाखल

जिममधील योगा रुममध्ये महिलेसोबत गैरवर्तन, पतीला शिवीगाळ; कोंढवा परिसरातील प्रकार

जामीन मिळवून देण्यासाठी लाच मागणार्‍या वकिलावर गुन्हा दाखल; तपास अधिकार्‍याला देण्यासाठी मागितले २० हजार