Pune Pimpri Chinchwad Crime News | जिममधील योगा रुममध्ये महिलेसोबत गैरवर्तन, पतीला शिवीगाळ; कोंढवा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जिममधील योगा रुममध्ये व्यायाम करत असताना एकाने महिलेसोबत गैरवर्तन केले. तसेच याचा जाब विचारल्याने पतीला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.27) रात्री नऊच्या सुमारास दोराबजी मॉल (Dorabji Mall) जवळील क्लोअर हईलँड येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) एकावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 40 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.28) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन हनुमंत (पूर्ण नाव माहित नाही रा. देवाची उरुळी) याच्यावर आयपीसी 354अ, 352, 504, 509 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती सोसायटीच्या जिम मध्ये व्यायाम (Exercise) करत होत्या.
फिर्यादी जिम मधील योगा रुममध्ये व्यायाम करत असताना सोसायटीत काम करणारा आरोपी हनुमंत याने जाणुन
बुजून जिमची लाईट बंद केली. फिर्यादी व्यायाम करत असलेल्या योगा रुम मध्ये येऊन त्याने धक्का देऊन फिर्यादी
यांच्यासोबत गैरवर्तन केले. याबाबत फिर्यादी यांच्या पतीने विचारले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली.
तसेच फिर्यादी यांना अश्लील शिवागाळ करुन अंगावर धावून आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे (API Shinde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिस्टल बाळगणाऱ्या एकाला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक

मध्यरात्री तरुणीच्या घरी जाऊन विनयभंग, बालाजीनगर परिसरातील घटना

Nashik Crime News | पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या चोरट्याला जालन्यातून अटक, नाशिक गुन्हे शाखेची कारवाई

जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाम्पत्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, खडकी परिसरातील घटना