Health Tips : वाढते वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात ‘हे’ 3 ड्रिंक्स, जाणून घ्या पद्धत

पोलिसनामा ऑनलाइन – प्रत्येक व्यक्तीला आकर्षक आणि सुडौल बांधा हवा असतो. परंतु कधी-कधी जास्त वजन या इच्छेत अडथळा बनते. या लठ्ठपणाच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का, या दिवसात शरीराची अतिरिक्त चरबी वेगाने विरघळण्यासाठी काही ड्रिंक्स उपयुक्त ठरू शकतात, हे घरगुती ड्रिंक्स कसे तयार करावेत ते जाणून घेवूयात…

हे आहेत ते ड्रिंक्स आणि कृती

1 गाजरचा ज्यूस
दोन गाजर कापलेले, एका लिंबूचा रस, आल्याचा छोटा तुकडा, थोडे सफेद जीरे, आर्धा ग्लास गुलाब रस हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये चांगले ब्लेंड करून घ्या. बाटलीत भरून ठेवा. त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. दिवसात कोणत्याही वेळेला एक ग्लास ज्यूस सेवन करा.

2 एलोवेरा ज्यूस
एलोवेरा जेल दोन चमचे, कोथेंबिर वाटलेली दोन चमचे, एक आल्याचा तुकडा, अर्धी कापलेली काकडी, पाणी अर्धा ग्लास आणि एक लिंबाचा रस हे सर्व ब्लेंडरमध्ये टाकून ब्लेंड करा. नंतर ग्लासात घेऊन रोज सकाळी अर्धा ग्लास साधे पाणी प्यायल्यानंतर नंतर ज्यूस सेवन करा.

3 काकडीचा ज्यूस
दोन कापलेल्या काकड्या, कोळीमिरी अर्धा चमचा, एका लिंबाचा रस, पाणी गरजेनुसार घेऊन सर्व ब्लेंडरमध्ये टाकून ब्लेंड करा. हा ज्यसू रोज सकाळी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. इतरही अनेक लाभ होतात.