महिलांनी ‘या’ 5 गोष्टी आपल्या आहारात जरूर समाविष्ट कराव्यात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : आधुनिक काळात निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. अन्न केवळ ऊर्जा प्रदान करत नाही, तर शरीराची दैनंदिन कार्ये देखील सुधारित करते. फळे, भाज्या, धान्य आणि शेंगदाणे यासारख्या पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थ मुबलक प्रमाणात आढळतात जे शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त असतात. लोह रक्तासाठी आवश्यक आहे, कॅल्शियम हाडे आणि प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी आवश्यक आहे. विशेषत: महिलांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. हार्मोनल बदलांमुळे महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांमधून जावे लागते. यासाठी या 5 गोष्टी आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. त्याबाबत जाणून घेऊया…

पालक

पालकामध्ये विविध प्रकारचे पोषक तत्व आढळतात. पालक त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असते. तसेच पालकचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. पालक या भाजीपाल्यात 90 टक्के पाणी असते. याव्यतिरिक्त पालकात ल्युटीन, पोटॅशियम, फायबर, फोलेट आणि व्हिटॅमिन-ई असते. हे सर्व गुण हिवाळ्यात पालकला सुपरफूड बनवतात. यात मॅग्नेशियम देखील आढळते जे पीएमएसच्या लक्षणांचा प्रभाव कमी करते. पालक हाडांसाठीही फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि दम्याचा धोका देखील कमी होतो.

जवस

जवस ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा मुख्य स्त्रोत आहे. डोळ्यांचे पडदे निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड प्रभावी घटक आहे. म्हणून, जवसाचे बियाणे डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. तसेच जवस हे हृदय आणि रक्तातील साखरेच्या पातळीसाठी फायदेशीर आहे. यात अँटी-इंफ्लेमेटरीचे गुणधर्म देखील आढळतात. यामुळे इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा प्रभाव कमी होतो.

क्रॅनबेरी

क्रॅनबेरी खूप चविष्ट असते. यामुळे मूत्रमार्गाच्या भागातील संसर्गाची समस्या दूर होते. तसेच दात किडणे या समस्येपासून देखील सुटका होते. क्रॅनबेरीला एनर्जी पॉवरहाउस म्हणतात. यासाठी महिलांनी क्रॅनबेरीचे सेवन केले पाहिजे.

टोमॅटो

बरेच लोक टोमॅटोला हलक्यात घेतात, परंतु टोमॅटो एक अतिशय गुणकारी भाजी आहे. त्यात लाइकोपीन असते, ज्यामुळे स्तनाचा कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच टोमॅटोमुळे हाडे मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

ओट्स

पाचक प्रणाली मजबूत ठेवणे, हृदय निरोगी ठेवण्याव्यतिरिक्त ओट्स रक्तदाब नियंत्रित करतात. ओट्स पीएमएसमुळे होणाऱ्या मूड स्विंग्सला देखील कमी करतात. त्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि पचन प्रक्रिया सहजतेने सुरू ठेवतात.