Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दूधाच्या चहाने वजन वाढते असे म्हटले जाते. यामुळे शरीरात फॅट वाढण्याची भिती असते. वजन कम करणारे लोक दुधाचा चहा अजिबात पित नाहीत. परंतु, जर तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने दुधाचा चहा तयार केलात, तर तुमचे वजन कमी होऊ शकते. लठ्ठपणा एक आनुवंशिक रोगसुद्धा आहे जो पिढ्यान पिढ्या चालत राहतो. जर तुम्ही लठ्ठपणामुळे त्रस्त असाल आणि वाढणारे वजन नियंत्रित करायचे असेल तर रोज दुधाचा चहा पिऊ शकता, मात्र हा चहा कसा बनवायचा ते जाणून घेवूयात –

साहित्य :
– 2 कप पाणी
-1 चमचा कोको पावडर
-1/2 चमचा चहापत्ती
– आल्याचा छोटा तुकडा
– दालचीनीचा छोटा तुकडा
– 1/2 चमचा गुळ
– 2-3 चमचा दूध
– वेलची

असा तयार करा चहा
एका पॅनमध्ये 2 कप पाणी, आले आणि दालचीनी काही वेळ उकळवा. यानंतर चहापत्ती, दूध, गुळ आणि कोको पावडर टाकून काही मिनिटांसाठी उकळू द्या. आता चहा तयार आहे. हा चहा दिवभरात दोनवेळा पिऊ शकता. रिकाम्यापोटी किंवा जेवणापूर्वी चहा पिऊ नका.

हे आहेत फायदे
* गुळामुळे कॅलरीज गेन होत नाहीत. यातील मसाल्यांमुळे हा चहा लाभदायक ठरतो.
* आले आणि दालचीनीमुळे मेटाबॉलिजम बूस्ट होते.
* वाढणारे वजन कंट्रोल होण्यास मदत होते.
* फॅट लवकर बर्न होते.
* कोको पावडरमुळे फायटोन्यूट्रीयंट्स जास्त असतात, मेटाबॉलिजम नियंत्रित राहते.
* दूधामुळे भूख वाढते.
* गुळ वेगाने फॅट बर्न करतो.