Exercise Tips : फिट राहण्यासाठी कोणत्या वेळी करावा व्यायाम!, सकाळी की सायंकाळी?; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आपल्याला माहित आहे की, व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले असते. व्यायाम तुम्हाला तंदुरुस्त ठेवतो. एक्सरसाइज केल्याने अनेक आजार दूर राहतात. एक्सरसाइज सुरू करायची असेल तर प्रश्न पडतो की कोणत्या वेळी करावा, सकाळी की संध्याकाळी. पण एक्सरसाइज करण्याची कोणतीही वेळ ठरलेली नाही, परंतु यासाठी अचूक शेड्यूल बनवले तर आपण निरोगी राहू शकतो.

मॉर्निंग वर्कआऊट
मार्निंगमध्ये वर्कआऊट करणार असाल तर कार्डियो परफेक्ट आहे. शरीर वर्कआऊट नंतर एंडोर्फिन रिलीज करते. यामुळे फ्रेशनेससह दिवसाची सुरुवात करू शकता.

सायंकाळचा वर्कआऊट
जे लोक सकाळी एक्सरसाइज करू शकत नाहीत ते सायंकाळी करू शकतात. यावेळी वर्कआऊट करणे चांगले आहे. सायंकाळच्या वर्कआऊटने शरीर थंड राहते, चांगली झोप येते.

एकुणच पाहिले तर व्यायाम करणे तुमच्या आरोग्यासाठी आणि तंदुरूस्तीसाठी अतिशय आवश्यक आहे. व्यायाम कधी करावा, सायंकाळी की सकाळी असा प्रश्न असेल तर दोन्ही वेळा चांगल्या आहेत. पण असे म्हटले जाते की, सकाळचे वर्कआऊट शरीर आणि मेंदूसाठी लाभदायक असते. परंतु महत्वाचे आहे की, कधीही करा पण वर्कआऊट करा आणि तो सुद्धा नियमित करा.