कडुलिंब : त्वचेशी संबंधित रोगांवर प्रभावी उपचार, जाणून घ्या इतरही फायदे

पोलीसनामा ऑनलाईन : अँटी- बायोटिक गुणांनी समृध्द कडूलिंब शतकानुशतके सर्वोत्कृष्ट औषध म्हणून वापरले जात आहे. याची चव निःसंशयपणे कडू आहे, परंतु त्याचे फायदे अफाट आहेत. कडुलिंबाचा वापर शेकडो औषधांच्या निर्मितीमध्ये केला जातो. कडूलिंब विषावर देखील प्रभावी आहे. एखाद्या विषारी प्राण्यांच्या चाव्यानंतर त्या ठिकाणी कडुनिंबाची पाने बारीक करून लावल्यास विष पसरत नाही. पावसाळ्यात खाज सुटणे आणि जखमा जास्त असतात, कडुनिंब पाण्यात उकळवून आंघोळ केली तर खाजपासून सुटका होते. कडुलिंबाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आढळतो जो त्वचेवरील डाग काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे. आपल्या बर्‍याच समस्या दूर करण्यात कडूलिंब प्रभावी आहे. जाणून घेऊया कडुनिंब आजारांवर कसे उपचार करते.

त्वचा भाजल्यावर कडूलिंबाने करा उपचार
जर स्वयंपाक करताना आपला हात भाजला असेल तर काळजी करू नका, कडुलिंबाची पाने बारीक करून ताबडतोब भाजलेल्या जागेवर लावल्यास त्वचेला थंडावा मिळेल.

कानात जखम असेल तर कडुनिंबाचा करा वापर
जर कानात कोणत्याही प्रकारची वेदना होत असेल तर कडुनिंबाच्या रसात मध मिसळून जखमेवर लावल्यास तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल.

दातदुखीसाठी फायदेशीर
दातदुखीपासून मुक्त करण्यासाठी कडुनिंब आणि लिंबू हे अतिशय प्रभावी उपचार आहेत. कडुलिंबाची पाने बारीक करून काही थेंब लिंबू मिसळा आणि पेस्ट बनवा आणि दातांवर लावा. या पेस्टमुळे तुम्हाला दातदुखीपासून आराम मिळेल.

कडुनिंब केसांसाठीही फायदेशीर
स्काल्फवर कोणत्याही प्रकारचे फंगस किंवा कोंडा असल्यास, कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर डोके धुवा. टाळूशी संबंधित समस्येपासून मुक्तता मिळेल.

इम्युनिटी बूस्ट करण्यात फायदेशीर
तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कडुनिंबाची पाने पिसून एक ग्लास पाण्यात टाकून प्या. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.