Diet tips : इम्यूनिटी पावर वाढवून कोरोना, प्रदूषण आणि थंडीतील आजारांशी एकाचवेळी लढण्यासाठी रोज खा ‘हा’ पदार्थ

कोरोना संकटादरम्यान थंडीचा हंगामदेखील सुरू झाला आहे. त्यातच वायू प्रदूषणाचा धोका कायम आहे. अशावेळी इम्यूनिटी सिस्टम कमजोर होण्यासह श्वास आणि हंगामी आजारांचा धोका होऊ शकतो. कोरोना आणि प्रदूषणाच्या दुहेरी संकटापासून वाचण्यासाठी शरीर मजबूत बनवणे गरजेचे आहे.

थंडीच्या काळात सर्दी, खोकला, ताप यांचा जास्त धोका असतो. ही लक्षणे प्रदूषण वाढल्याने आणखी धोकादायक होतात, ज्यामुळे कोरोनाचा संसर्गदेखील होण्याची शक्यता वाढते.

इम्यून पावर मजबूत करण्यासाठी तुम्हाला याकाळात मधाचा वापर केला पाहिजे. मधात ती शक्तीशाली पोषकतत्व असतात जी तुम्ही या तीन गंभीर धोक्यापासून वाचवू शकतात.

हे आहेत मधाचे फायदे

– सर्दी, खोकला, ताप आणि घशाची खवखव यात उपयोगी आहे.

– ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनुसार कोणतेही इन्फेक्शन टाळण्यासाठी मध उपयोगी आहे. घशाच्या कोणत्याही इन्फेक्शनमध्ये आराम मिळतो.

– अपर रेसपिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये एंटीबायोटिक ऐवजी मध चांगला पर्याय आहे.

– सकाळी रिकाम्यापोटी मध-लिंबू पाण्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होते, रक्तशुद्ध होते, लठ्ठपणा कमी होतो, अ‍ॅलर्जीपासून बचाव होतो.

– लसूण आणि मधाचा मुरंब्बा खाल्ल्याने शारीरीक ताकद वाढते. कमजोरी आणि थकवा दूर होतो. इम्यून सिस्टम मजबूत होते.

– मुलांना रात्रीचा खोकला येत असल्यास गरम पाण्यात किंवा एक हर्बल चहासोबत 2 चचे मध मिसळून द्या. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळाला मध देऊ नये.

– थंडीत खोकला, फ्लू, ताप, वायरल फिवर, अ‍ॅलर्जी, घशाची खवखव, बंद नाक इत्यादीवर मध उपयोगी बआहे.

– नियमित सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते. कँसरचा धोका कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होते.