‘त्या’ फसवणूक प्रकरणात पत्रकार जैन, बडतर्फ पोलिस जगतापच्या जामीनवर अर्जावर शुक्रवारी सुनावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सेनापती बापट रस्त्यावरील जमिनीच्या व्यवहारात 72 लाख 30 हजारांची फसवणूक आणि खंडणी प्रकरणात तिघांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि. 24) सुनावणी होणार आहे. याप्रकरणात जामीन मिळावा यासाठी, बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात सोमवारी (दि. 20) अर्ज करण्यात आला होता. त्यावर मंगळवारी सरकारी वकीलांनी आपले म्हणणे सादर केले. त्यावर, शुक्रवारी युक्तिवाद होऊन सुनावणी होईल, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.

याप्रकरणात जयेश जितेंद्र जगताप, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस परवेझ शब्बीर जमादार यांच्या विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनापती बापट रस्त्यावरील जमिनीचा दाव्याचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचा विश्वास आरोपींनी दाखवला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने आरोपींबरोबर जमिनीचा व्यवहार केला होता. परंतु, संशयित आरोपी यांनी त्या व्यक्तीची विविध मार्गाने तब्बल 72 लाख 20 हजार रुपये घेऊन जमिनीचा ताबा न देता फसवणूक केल्याचा प्रकार घडला. व्यवहाराबाबत त्याने आरोपींना विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणात, सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी जामीनासाठी न्यायालयापुढे अर्ज केला आहे. त्यावर, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.