आता डोळे सांगतील हृदयाचे ‘हाल’, गंभीर आजाराची देईल ‘अचूक’ माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  म्हणतात की डोळ्यांतून भाव व्यक्त होतात. हीच बाब आता एका संशोधनातून उघड झाली आहे. या संशोधनात कळाले की डोळे हृदयाच्या समस्येची माहिती देतात. डॉक्टर हृदयविकार असलेल्या रुग्णांच्या आरोग्याची तपासणी त्याचे वय, धुम्रपान करण्याची सवय आणि उच्च रक्तदाब यावरुन करतात. परंतू डोळ्यामागच्या रक्त वाहिन्यांमध्ये होणार बदल हृदयाच्या आरोग्याची माहिती देऊ शकतात.

स्वित्झर्लंडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ बासेलचे प्राध्यापक हेनर हानसेन यांनी सांगितले की आमच्याकडे जी काही माहिती आहे त्यातून स्पष्ट होते की अत्यंत कमी वयाची मुलं ही आरोग्याने सुदृढ आहेत. त्यांच्यात देखील उच्च रक्तदाबाच्या कारणाने परिवर्तन होते. यावरुन हे स्पष्ट होते की पुढील काळात त्यांना हदयरोगाच्या काही समस्या उद्भवू शकतात की नाही. परंतू वयस्करांमध्ये देखील ह्या समस्या पाहायला मिळतात. ज्यातून हदयरोगाच्या संभावना लक्षात येतात. डोळ्यात होणारे परिवर्तन आणि हदयाच्या तपासासंबंधी हा आता पर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे. हा संशोधन प्रबंध अमेरिकन हार्ट असोसिएशन हायपरटेशन जनरलने प्रकाशित केला आहे. या संशोधनात स्पष्ट झाले की डोळ्यातील छोट्या रक्त वाहिन्यामुळे तेव्हा परिवर्तन पाहिला मिळेल जेव्हा हदयाच्या धमण्या आखडल्या जातील. किंवा रक्तदाबात वाढ होईल.

दृष्टी प्रभावित होत नाही
शोधकर्ता प्रो रुतनिका यांनी सांगितले की रेटिनात होणाऱ्या या बदलामुळे व्यक्तीची दृष्टी प्रभावित होत नाही. परंतू यातून हदयाच्या आजारासंबंधी अचूक ओळख करता येते. आता यावर संशोधन केले जात आहे की डोळ्यात होणाऱ्या बदलावरुन एखाद्या व्यक्तीला 10 वर्षानंतर होणाऱ्या हदयाच्या समस्येची माहिती मिळेल की नाही.

रेटनल मोर्फोलॉडी वरुन कळेल माहिती
लंडनच्या सेंट जार्ज यूनिव्हर्सिटीच्या प्रमुख शोधकर्ता अलेसिया रुडनिका यांनी सांगितले की जर शरीरात काहीही होत असेल तर त्यामुळे डोळ्याच्या मागे परिवर्तन होते. तर आपण डोळ्यावरुन अनेक बाबी जाणून घेऊ शकतो. रेटिनल मोर्फोलॉजीला फक्त एक शोध उपकरण बनवण्याच्या जागी क्लिनिक अभ्यासात देखील आणण्याची गरज आहे. या शोधात यू के बायोबँकमधून 55,000 वयस्करांच्या डाटावर अध्ययन करण्यात आले. एका आटोमेडेड प्रोग्रामने प्रत्येक सहभागी झालेल्यांच्या डोळ्याच्या मागील रक्तवाहिन्याचे डिजिटल फोटोंची तपासणी केली.

Visit : Policenama.com