Heavy Rain in Maharashtra | महाराष्ट्रात पुढील 2 दिवसांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Heavy Rain in Maharashtra | पुढील दोन दिवसांमध्ये मान्सूनचा (Monsoon) प्रवास दक्षिण अरबी समुद्राकडे (South Arabian Sea) तसेच बंगालच्या उपसागराच्या (Bay of Bengal) दक्षिण व मध्य भागात होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. याशिवाय उत्तर तामिळनाडूच्या (Tamil Nadu) अंतर्गत तसेच त्या भोवतालच्या भागात असलेल्या चक्रवाताची स्थिती (Cyclone) कायम आहे. परिणामी गेल्या 24 तासात कर्नाटकची किनारपट्टी, अंतर्गत कर्नाटक व केरळ मधील काही ठिकाणी मुसळधार (Torrential) व तामिळनाडूत काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडला. महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह (Thunder) अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

महाराष्ट्रातील विदर्भ (Vidarbha) व मराठवाड्यात (Marathwada) तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या (Heavy Rain in Maharashtra) सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच कोकणात शुक्रवारी (दि. 20) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर दक्षिण कोकण व गोवा किनारपट्टीवर (Goa Coast) सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

 

पुण्यात ढगाळ वातावरण
पुणे शहरात (Pune City) गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
परंतु बुधवारच्या तुलनेत कमाल तापमान सारखेच म्हणजे 38 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.
किमान तापमान 24.6 अंश सेल्सिअस इतके होते. राज्यात सर्वाधिक तापमान अकोला व वाशिम येथे 42.5 इतके नोंदवण्यात आले.

 

Web Title :- Heavy Rain In Maharashtra | Heavy rain expected in maharashtra likely to receive unseasonal rains in the next two days

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा