पुण्यामध्ये जोरदार पाऊस

पुणे पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहराला पाणी पुरवठा आणि शेतीसाठी बांधण्यात आलेल्या खडकवासला धार साखळीत काल रात्री पासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे गेली महिनाभर पावसाची ओढ लागून राहिलेले पुणेकर सुखावले आहेत. पुढील आठ दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

गेली काही दिवस पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धारणसाखळीच्या कॅचमेन्ट एरिआमध्ये पावसाने ओढ दिली होती. अशातच धरणातील पाणीसाठा कमी होत चालल्याने शहरात गढूळ पाणी पुरवठा होत होता. मात्र मागील चोवीस तासात पावसाने जोर धरल्याने पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे.

मागील चोवीस तासात खडकवासला धरण क्षेत्रात 23 मि. मी.पानशेत आणि वरसगाव 72 मि.मी.आणि टेमघर धरण क्षेत्रात 119 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या चारही धरणात मिळून 4.05 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

जाहिरात