नाशिकमध्ये परतीचा पाऊस लावणार जोरदार हजेरी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

१७ ते २१ सप्टेंबर दरम्यान परतीचा पाऊस नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल, त्यामुळे पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांनाही जीवदान मिळू शकणार आहे. यंदा नाशिकमध्ये पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे. यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त होते. मात्र, आता हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरीही त्याच्या पुनरागमानाची वाट पहात आहेत.

[amazon_link asins=’B0756RF9KY,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’80d0d8ff-b8a7-11e8-9809-8960a845bd2a’]

गेली दोन वर्षे नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला होता. यंदा मात्र, जूनपासून सप्टेंबरच्या अगदी पंधरवड्यापर्यंत पाऊस समाधानकारक पडला नाही. प्रत्येक महिन्याच्या अखेरीस त्या त्या महिन्याच्या सरासरीपर्यंत पाऊस पोहोचल्याचे दिसून येत आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून तर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागातून पाऊस गायब झाल्याने शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठल, सुरगाणा यांसारख्या तालुक्यांमध्ये सातत्याने हजेरी लावणारा पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून गायब झाला आहे. किमान तापमान कमी होत असल्याने पावसाचे पूनरागमन होणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु, गुरुवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार होऊ लागले आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी १७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरवाढीच्या संकटासोबत इंधन आयातीचा नवा पेच