नेमबाजीत हिना सिध्दूला कांस्यपदक

जकार्ता : वृत्तसंस्था

भारताच्या हिना सिध्दूने कांस्यपदकाची कमाई करत भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं. हीना सिध्दूने १० मिटर एअर पिस्तुल प्रकारात कास्य पदक जिंकले. राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेत्या मनूच्या वाट्याला पुन्हा निराशा आली .

[amazon_link asins=’B077PWBC7J,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’84d958ce-a787-11e8-88c7-4bd67a8057a6′]

नेमबाजीत महिला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारतच्या दोन शूटर मनू भाकर आणि हीना सिध्दू यांनी फायनलसाठीच्या अंतिम आठ खेळडूंच्या यादीत स्थान मिळवले.या प्रकारात हीना सिध्दूने २१९.२ गुण मिळवून कास्य पदक जिंकले. तर मनू भाकरला १७९.२ गुण मिळाले ती पाचव्या स्थानावर राहिली.

हिनाच्या कांस्य पदकासोबत भारताच्या खात्यात एकूण २३ पदक जमा झाली असून आत्ता पर्यन्त नेमबाजांनी नऊ पदक मिळवून दिली आहेत .