केरळच्या पुरग्रस्तांसाठी नगरसेवक प्रकाश कदम यांच्याकडून मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

केरळ राज्यात आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली. बरेच प्रपंच बेघर झाले तर हजारो कुंटूबाचे अन्न पाण्याचे ही हाल झाले. परंतू, माणूसकीची भावना अजून बहूतांश समाजाच्या ह्रदयामधे जिवंत असल्याचे चित्र विविध मदतीच्या माध्यमांतून पाहायला मिळाले. अजून ही तिथले नागरिक या धक्क्यातून सावरले नाहीत. मदतीचे अनेक हात देश विदेशातून अनेक प्रकारे अद्याप पुढे येत आहे.[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’747c921e-bcea-11e8-9f9e-4f4237ac7dae’]

पुण्यामधून देखील अनेक लोकांनी मदत पाठवली. तशीच मदत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कात्रज भागातील नगरसेक प्रकाश कदम यांनी 5 टन तांदूळ व 1100 किलो साखर पाठवून केली. याबरोबरच अनेक स्तरांतून जीवनपयोगी वस्तूंचा साठा करुन एक ट्रक आज केरळ राज्याकडे रवाना झाला.

काॅंग्रेस सोबत युती करण्यास तयार, पण….  – प्रकाश आंबेडकर

नगरसेवक प्रकाश कदम म्हणाले, केरळ राज्यात घडलेली परिस्थिती खुपच भयावह होती. मी माझ्यावतीने आज तांदूळ व साखरेच्या माध्यमातून छोटी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरसेवक प्रकाश कदम यांच्यासमवेत मुलगा प्रतीक कदम तसेच सुभाष जाधव, संतोष धुमाळ, कैलास कार्ले हे उपस्थित होते.