Hema Malini On Kangana Ranaut | उद्या राखी सावंतही येईल ! कंगना मथुरातून लोकसभा लढवण्याच्या चर्चेवर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Hema Malini On Kangana Ranaut | बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हि भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार राजकीय वर्तुळात रंगली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा (Mathura) लोकसभा मतदारसंघातून कंगना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार समजत आहे. यावरून पत्रकारांनी मथुरेच्या विद्यमान भाजप (BJP) खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांना आपली प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी शांतपणे ‘चांगली गोष्ट आहे’ अशी प्रतिक्रिया दिली. तसेच पुढे तुम्हाला मथुरात चित्रपटातील तारे-तारकाच हवेत ना, उद्या राखी सावंतही (Rakhi Sawant) येईल असा टोलासुद्धा लगावला. (Hema Malini On Kangana Ranaut)

 

हेमा मालिनी नेमक्या काय म्हणाल्या?

पत्रकार – कंगना रणौत मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे…
हेमा मालिनी – अच्छा, खूप चांगली गोष्ट आहे
पत्रकार – तुमचे विचार काय आहेत?
हेमा मालिनी – माझे विचार मी काय सांगू, माझे विचार देवावर अवलंबून आहेत, लॉर्ड क्रिश्ना विल डू इट, व्हॉट ही वाँट्स (भगवान श्रीकृष्णाला जे हवे आहे, तो ते करुन घेईल)
हेमा मालिनी – जे बिचारे इथे मथुरा मतदारसंघातून लोकसभा खासदार होऊ इच्छितात, त्यांना तर तुम्ही होऊ देणार नाहीत. तुम्ही सगळ्यांच्या डोक्यात टाकलंय की फिल्म स्टारच बनणार, मथुरात फिल्म स्टारच पाहिजे, उद्या राखी सावंतही होईल. अशी प्रतिक्रया देऊन त्या कारमध्ये बसून निघून गेल्या.

मालिनी 2014 आणि 2019 अशी सलग दोन वर्ष मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार कुंवर नरेंद्र सिंह यांचा जवळपास तीन लाखांच्या मताधिक्याने पराभव केला आहे.

 

Web Title :- speculations of actor kangana ranaut contesting loksabha elections from mathura bjp mp hema malini reacts said will be rakhi sawant in future

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई