गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्याता

गणेशोत्सावत युरिया खताचा वापर करून स्फोट घडवण्याची शक्यता

पुणे/पिंपरी  : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सवाला काही दिवस उरले असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गणेशोत्सवात दहशतवादाचे संकट असल्याचे समोर आले आहे. युरिया खताचा वापर करून स्फोट घडवून आणण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पहिल्यांदाच खत विक्री करणाऱ्यांना नोटीसा बजावल्याची माहिती मिळत आहे.

युरिया खताचा वापर करून दहशतवादी स्फोट घडवू शकतात त्यामुळे शहरातील सर्व खत विक्रेत्यांना आणि खतांचा साठा करणाऱ्या गोडाऊन मालकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. गणेशोत्सव आणि त्यानंतर येणारा नवरात्रोत्सवामध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता आहे. खत विक्रेत्यांना दिलेल्या नोटीसेमध्ये खत विक्री केल्यानंतर खत घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या क्रमांकाची नोंद करून ठेवण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

तसेच पोलिसांकडून वेळोवेळी तपासणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीतावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीद्वारे खत विक्रेते आणि खतांचा साठा करून ठेवणाऱ्या गोडाऊन मालकाला सांगण्यात आले आहे. खताच्या दुकानामध्ये मिळणारे अमोनियन नायट्रेट हे जीलेटीनमध्ये वापरले जाऊ शकते. याचा उपयोग बॉम्बसाठी उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे शहरातील खत दुकानदार आणि खतांचा साठा करून ठेवणाऱ्या गोडाऊन मालकांना नोटीस देण्यात आली आहे हे प्रतिबंधात्मक आदेश पुढील दोन महिन्यांसाठी असणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी सांगितले.