High Blood Pressure | भारतात प्रत्येक ४ पैकी ३ लोकांचे हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही! आपल्या सवयीत करा ताबडतोब बदल

नवी दिल्ली : भारतासह जगभरात हाय ब्लड प्रेशरच्या (High Blood Pressure) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता भारतातील हाय ब्लड प्रेशरबाबतच्या एका अभ्यासात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, भारतातील हाय ब्लड प्रेशरच्या एक चतुर्थांश पेक्षा सुद्धा कमी रुग्णांचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. म्हणजेच प्रत्येक ४ पैकी ३ रुग्णांचे ब्लड प्रेशर आउट आणि कंट्रोलमध्ये राहात नाही. द लॅन्सेट रीजनल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात ही माहिती देण्यात आली आहे (High blood pressure).

हृदयरोग्यांसाठी (Heart Disease) हाय ब्लड प्रेशर एक महत्त्वाचा बदल करण्यायोग्य फॅक्टर आहे, जो अकाली मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, नवी दिल्ली आणि अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांच्या पथकाने २००१ नंतर प्रकाशित झालेल्या ५१ अभ्यासांचा पद्धतशीर आढावा घेतला ज्यामध्ये भारतातील हाय ब्लड प्रेशर कंट्रोलचा दर आढळून आला.

पुरुषांची स्थिती चिंताजनक
संशोधकांना आढळले की, २१ अभ्यासांमध्ये (४१%) स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हाय ब्लड प्रेशर नियंत्रणाचा दर वाईट आहे आणि सहा अभ्यासांमध्ये (१२%) ग्रामीण रूग्णांमध्ये नियंत्रणाचे दर वाईट आहेत. अनियंत्रित ब्लड प्रेशर हृदयविकारात जोखमीच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे.

भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक
२०१६-२०२० दरम्यान भारतातील हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांपैकी एक चतुर्थांशपेक्षा कमी रुग्णांचे ब्लड प्रेशर नियंत्रणात होते. हाय ब्लड प्रेशर हे भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हृदयाच्या रुग्णांमधील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी हाय ब्लड प्रेशरवर अधिक चांगले नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे आहे. (High Blood Pressure)

२१ वर्षांत रूग्णांचे प्रमाण ६ वरून २३ टक्के
या अभ्यासात केरळ राज्यातील संशोधक सुद्धा सहभागी होते. संशोधकांनी सांगितले की, जागरुकता आणि आरोग्य सुविधांपर्यंत चांगली उपलब्धता असूनही, गेल्या २१ वर्षांत हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करू शकणाऱ्या रुग्णांची संख्या ६ टक्क्यांवरून २३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

हाय ब्लड प्रेशर कसा नियंत्रित करावा?

वजन कमी (Weight Loss)
वजन जास्त असल्यास, ते हृदयावर ताण आणू शकते. रक्तदाब वाढवू शकते. वजन कमी केल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.

नियमित व्यायाम करा (Exercise Regularly)
व्यायाम ब्लड फ्लो सुधारण्यास आणि ब्लड प्रेशर कमी मदत करू शकतो.

हेल्दी डाएट (Healthy Diet)
हेल्दी डाएट घेतल्यास ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. आहारात ताजी फळे, भाज्या आणि धान्यांचा समावेश करा.
सोडियम, साखर, सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स असलेले पदार्थ टाळा.

तणाव कमी करा
तणाव ब्लड प्रेशर वाढवू शकतो. तणाव कमी करण्याचे निरोगी मार्ग शोधा. योग, मेडिटेशन किंवा स्ट्रेचिंग करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खून; प्रचंड खळबळ