High Cholesterol | दूध पिण्याने वाढते ट्रायग्लिसराईड का? येथे जाणून घ्या कोलेस्ट्रॉलचे पूर्ण गणित

पोलीसनामा ऑनलाइन टीम – High Cholesterol | आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की, दूध पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु वेळोवेळी होणार्‍या नवनवीन संशोधनानंतर दुधाचा आरोग्यावर होणार्‍या परिणामाचे विविध दावे केले जातात. अशावेळी लोकांच्या मनात शंका निर्माण होते की अखेर दूध पिण्याने खरोखरच ट्रायग्लिसराइड किंवा कोलेस्ट्रॉल वाढते का, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. सत्य काय आहे ते येथे जाणून घेऊया (High Cholesterol) –

 

कोलेस्ट्रॉलमुळे धोका, बदला जीवनशैली
जर तुम्हालाही हाय कोलेस्टेरॉल किंवा वाढलेल्या ट्रायग्लिसराईडची समस्या असेल तर जीवनशैली बदलण्याची नितांत गरज आहे. कारण कोलेस्टेरॉल केवळ दिनचर्येत बदल करून नियंत्रित केले जाऊ शकते. याशिवाय कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडबद्दल अनेक समज आहेत. सामान्यतः असे मानले जाते की दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॅट जास्त असते, त्यामुळे त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. (High Cholesterol)

 

जाणून घ्या High Cholesterol म्हणजे काय
High Cholesterol म्हणजे केवळ चरबी नसून ते एक स्टेरॉल आहे, जे एक प्रकारचे लिपिड आहे, ज्यामध्ये चरबी आणि प्रोटीन दोन्ही असते. जेव्हा चरबी आणि प्रोटीन मिसळतात तेव्हा ते एक चिकट मेण बनते. या मेणासारख्या पदार्थाला कोलेस्टेरॉल म्हणतात आणि जेव्हा त्याचे प्रमाण रक्तात वाढते तेव्हा रक्तप्रवाहात खूप अडथळे येतात आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये साचल्यामुळे ब्लॉकेजची समस्या निर्माण होते. पुढे ब्लॉकेजमुळे हृदयविकाराची समस्या होते.

दुधामुळे वाढत नाही कोलेस्ट्रॉल लेव्हल
इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार, दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर विशेष परिणाम होत नाही. पण जर तुम्ही दुधापासून बनवलेले तूप, चीज, मावा इत्यादी पदार्थांचे सेवन जास्त केले तर कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराइडची पातळी वाढू शकते.
250 मिली दुधात 8 ग्रॅम फॅट असते, परंतु दुधामध्ये फॅट व्यतिरिक्त इतर पोषक घटक असतात, ज्याची शरीराला गरज असते.
कॅल्शियम समृद्ध दूध हाडे मजबूत करण्यास आणि वृद्धापकाळात ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करते.
मात्र, ज्या लोकांना आधीच High Cholesterol ची समस्या आहे, अशा लोकांनी कमी चरबीयुक्त गाईचे दूध सेवन करावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Cholesterol | high cholesterol drinking milk increases triglyceride know what is the reality

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Health Problems Symptoms | सकाळी उठण्याची इच्छा होत नाही, खुप आळस येतो का? मग तुमच्या आरोग्यासाठी व्हा अलर्ट

 

Type 2 Diabetes | टाईप 2 डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स आणि बचावाची पद्धती कोणत्या, जाणून घ्या सविस्तर

 

Diabetes Tips | ‘ही’ भाजी पाण्यात उकळून प्यायल्याने वेगाने कमी होईल Blood Sugar, वाढेल इन्सुलिन