Gold Price Today : सोन्याच्या दरात तेजी तर चांदीचे भावही वधारले, जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने आणि चांदीमध्ये आज तेजी दिसून आली आहे. साडेतीन मुहूर्तापैका एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोने दरात तेजी होती. कोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत. MCX वर सोन्याचा वायदा 0.7 टक्क्यांनी वाढून 48 हजार 003 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. तर चांदीच्या दरात 1.2 टक्क्यांची मोठी वाढ झाली असून दर 71 हजार 940 रुपये प्रति कोलोग्रॅमवर पोहोचला आहे.

मागिल वर्षीदेखील याच काळात सोन्याच्या किमतींमध्ये 0.5 टक्क्यांनी वाढ पहायला मिळाली होती. तर चांदीच्या किंमतीमध्येही 0.9 टक्क्यांची तेजी होती. जागतिक बाजाराबाबत सांगायचे झाले तर अमेरिकी डॉलर आणि ट्रेजरी यील्डमध्ये घसरण झाल्याने सोन्याच्या किमतीत तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. सोन्याचे सध्याचे भाव 0.6 टक्क्यांनी वाढून 1852.39 डॉलवर पोहोचले आहेत.

24 कॅरेट सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याच्या भावाबाबत बोलायचं झाल्यास आज दिल्लीमध्ये 10 ग्रॅमची किंमत 50 हजार 220 इतकी आहे. चेन्नईमध्ये 49 हजार 660, कोलकाता 49 हजार 930 रुपये आणि मुंबईमध्ये 46 हजार 080 रुपये इतकी आहे.

सोनं खरेदीची सुवर्ण संधी

आर्थिक वर्ष 2021-22 साठीची सॉवरेन गोल्ड बॉन्डची पहिली विक्री 17 मे म्हणजेच सोमवारपासून सुरु झाली आहे. ही विक्री पाच दिवस चालेल. म्हणजेच तुमच्याकडे पाच दिवस बाजारातील किमतीपेक्षे स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी आहे.

RBI चा भाव निश्चित

वित्त मंत्रालयानं सांगितलं, की सॉवरेन गोल्ड बॉन्ड मे ते सप्टेंबरच्या दरम्यान सहा हप्त्यांमध्ये जारी केले जातील. रिजर्व बँकेनं यासाठी 4 हजार 777 रुपये प्रति ग्रॅमचा भाव निश्चित केला आहे. जे लोक यासाठी ऑनलाइन अर्ज करतील आणि डिजीटल पेमेंट करतील त्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे.