Covid-19 : ‘कोरोना’मुळे हिंगोलीत एकाचा मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा रुग्णालयकडे २० जुलै रोजी रात्री उशिराने प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात २२ नवीन कोविड-१९ चे रुग्ण आढळून आले आहेत. तर हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथील एका पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

हिंगोली जिल्हा रूग्णालयाकडे प्राप्त अहवालानुसार भाजीमंडी कळमनुरी येथील ६ व्यक्ती, अशोक नगर वसमत येथील २ व्यक्ती, शुक्रवार पेठ वसमत १ व्यक्ती, आझम कॉलनी हिंगोली येथील १ व्यक्ती, विठ्ठल कॉलनी, श्रीनगर, हिंगोली येथील १ व्यक्ती, कासारवाडा हिंगोली येथील १ व्यक्ती, आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथील ५ व्यक्ती तर तालाबकट्टा, हिंगोली येथील ५ व्यक्ती असे एकुण २२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच कोरोना केअर सेंटर वसमत अंतर्गत एकूण ९ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे सध्या भरती असलेल्या १९ रुग्णांपैकी १० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण ४३३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ३१९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ११३ रुग्णांवर उपचार चालू आहेत.