Hingoli Crime News | महिला आंघोळीला गेली असताना शेजारच्याने डाव साधत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – Hingoli Crime News | हिंगोली जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आरोपीने हिंगोली तालुक्यातील अमला या ठिकाणच्या एका महिलेचे अंघोळ करताना फोटो काढले. यानंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यवार अत्याचार केले. या प्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hingoli Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?
आमला येथील पीडित महिला आंघोळ करत होती. यादरम्यान या महिलेचा शेजारी असणाऱ्या परमेश्वर कोरडे याने मार्च 2021 मध्ये संधी साधत पीडित महिलेचे आंघोळ करतानाचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले. यानंतर त्याने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याची धमकी या महिलेला दिली. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. आपली बदनामी होईल म्हणून तिने हा सगळा अत्याचार सहन केला.

 

यानंतर त्रास असह्य झाल्यानंतर पीडित महिलेने या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिचा पती व कुटुंबाला दिली.
यानंतर या महिलेच्या कुटुंबीयांनी परमेश्वर याच्याकडे जाऊन जाब विचारला असता त्याने महिलेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित महिलेने आपल्या कुटुंबासह हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पीडितेने परमेश्वर कोरडे यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक आर.एन.मळघणे, उपनिरीक्षक एस. एम. मुपडे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

Web Title :- Hingoli Crime News | man who click nude photos of women in hingoli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास