Hingoli Crime News | ऑन ड्युटी पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत, गुन्हा दाखल; पोलीस दलात खळबळ

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Hingoli Crime News | रात्र गस्तीवर असलेला पोलीस अधिकारी मद्यधुंद (Police Officer Drunk) अवस्थेत आढळून आले. हा पोलीस अधिकारी एवढा मद्यधुंद होता की, त्याला एका जागेवर उभे देखील राहता येत नव्हते. रात्र गस्तीवर असताना पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी गेले असता त्यांची अवस्था पाहून पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काच (Hingoli Crime News) बसला. हा प्रकार हिंगोली पोलीस (Hingoli Police) दलात घडला असून सुनील गिरी (API Sunil Giri) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. गिरी हे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात (Hingoli City Police Station) सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच सुनील गिरी यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिरी यांची 9 एप्रिलला नाईट ड्युटी होती. त्यामुळे ते जिल्हा रात्री गस्तीवर (Bight Patrol) होते. दरम्यान गस्तीवर असताना गिरी हे रात्री दोनच्या सुमारास चेकिंगसाठी औंढा पोलीस ठाण्यात (Aundha Police Station) आले. मात्र, पोलीस ठाण्यात जाताच त्यांची अवस्था पाहून पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या कर्मचऱ्यांना धक्का बसला. कारण गिरी यांना व्यवस्थित चालता देखील (Hingoli Crime News) येत नव्हते. ते बोबड्या भाषेत बोलत होते. तसेच त्यांच्या तोंडाचा उग्र वास येत असल्याने त्यांनी मद्यपान केल्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

रात्र चेकिंगसाठी औंढा पोलीस ठाण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिरी हे मद्यपान केल्याचे
आढळून आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.
तसेच त्यांना व्यवस्थित चालता देखील येत नसल्याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली.
यानंतर वरिष्ठांनी सुनील गिरी याच्याववर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर गिरी यांच्यावर
औंढा पोलीस ठाण्यात आयपीसी 85(1) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी दिलीप नाईक यांनी फिर्याद दिली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक झुंजारे (PI Zunjare) करीत आहेत.
गुन्हा दाखल केल्यानंतर सुनील गिरी यांनी नोटीस देऊन सोडण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने हिंगोली पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Web Title :  Hingoli Crime News | on duty police officer drunk police registered a case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MP Supriya Sule | अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

Chandrakant Patil At Policenama Pune Office | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट, विविध विषयांवर चर्चा

CM Eknath Shinde | भविष्यात शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान

Maharashtra Politics News | ‘अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे…’, ईव्हीएमच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला