पाच लाखांसाठी विवाहितेचा खून करून मृतदेह लटकावला

ADV

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन

आज देश प्रगतीच्या दिशेने पावले टाकत आहे. मात्र हुंडाबळी सारख्या घटना आजही घडतायत हे दुर्दैव मानावे लागेल. हिंगोली येथील एका घटनेत पाच लाख रुपयांकरिता विवाहितेची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्याचा संशय येऊ नये याकरिता तिचा मृतदेह लटकवण्यात आल्याचे देखील समजते आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वसमतमधील गुलशननगर भागात १३ सप्टेंबरला सकाळी ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सलमा बेगम अब्दुल रहमान (वय २८ वर्ष) लटकलेल्या अवस्थेत आढळल्या.

याबाबत मिळालेली अधिक माहिती शी की, मृत सलमा बेगम यांचे वडील मोहम्मद खलील महम्मद शिकूर (वय ४८ वर्ष) यांच्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींचा व्यवसाय वाढवण्यासाठी ४ ते ५ लाख रुपयांची मागणी करत होते. पण मागणी पूर्ण न झाल्याने सासरची मंडळी कायम सलमा बेगमचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. त्यानंतर १३ तारखेला त्यांनी तिचा गळा दाबून खून केला. हत्येचा संशय येऊ नये यासाठी तिने आत्महत्या केल्याचं दाखवण्यासाठी सासरच्या लोकांनी मृतदेह लटकवला.

या प्रकरणी मृत महिलेचा पती अब्दुल रहमान गुलाम अहमद, दीर आरेफ गुलाम अहमद, जाऊ समीनाबी आरेफ, सासरा गुलाम अहमद, सासू जैनबी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर सगळ्यांवर कलम ४९८(अ), ३०२, ३४, भांदवि अंतर्गत वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु आहे.

[amazon_link asins=’B01HCSV3MQ,B07675R45Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5923c372-b815-11e8-8795-a10d4acde204′]