HM Amit Shah Pune Visit | गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत ! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

छत्रपती शिवरायांच्या पुतळा स्मारकाचे भूमिपूजन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे होणार लोकार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – HM Amit Shah Pune Visit | देशाचे गृहमंत्री अमित शाह येत्या रविवारी (१९ डिसेंबर) पुणे दौऱ्यावर (HM Amit Shah Pune Visit) असून गृहमंत्री शाह थेट पुणे महापालिकेत (Pune Corporation) येणार असून त्यांच्या शुभहस्ते हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. (HM Amit Shah Pune Visit)

पुणे महापालिकेच्या हिरवळीवर महापौर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारक साकारण्यात येत आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात येत आहे. हे दोन्ही कार्यक्रम गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहेत.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘दोन्ही कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale), उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांची विशेष उपस्थित राहणार असून गृहमंत्री शाह हे स्वतः महापालिकेत येत असल्याचा विशेष आनंद आहे.’

‘हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी आपणा सर्वांनाच दिशा दिलेली आहे.
दैनंदिन जीवनात काम करत असताना या दोन्ही महापुरुषांच्या वाटेवरून वाटचाल करणे, हे प्रेरणादायी आहे.
म्हणूनच महापालिका म्हणून पुणेकरांसाठी काम करत असताना या दोन्ही महापुरुषांचे पुतळे असावीत, ही मनोमन इच्छा होती.
जी आता पूर्णत्वास जात असताना मनस्वी समाधान आहे.’

Web Title :- HM Amit Shah Pune Visit | Home Minister Amit Shah in Pune Municipal Corporation on Sunday ! Information of Mayor Muralidhar Mohol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Supreme Court | ‘सेक्स वर्कर्सना त्वरीत रेशन, आधार आणि मतदान कार्ड द्या’, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

OBC Reservation Maharashtra | सुप्रीम कोर्टाच्या धक्क्यानंतर ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय

 

PM Kisan चा 10 वा हप्ता येणार आहे खात्यात, परंतु अगोदर तपासा आपले KYC; जाणून घ्या

Urfi Javed | उर्फी जावेदने केली बोल्डनेसची हद्द पार, ब्रालेस होऊन बेडवर केलं शुट, फॅन्स म्हणाले – ‘आग लावली…’