स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी! ‘या’ बँकेनं Home Loan वर व्याजदरात केली कपात, प्रोसेसिंग फी सुद्धा नाही; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Home Loan | बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ने गुरुवारी होम लोनच्या (Home Loan) प्रारंभिक व्याजदरात 0.25 टक्के कपातीची घोषणा केली. अलिकडेच इतर काही खासगी बँकांनी सुद्धा होम लोनवर स्पेशल ऑफर्स सादर केल्या आहेत. बँक ऑफ बडोदा आता 6.50 टक्केच्या प्रारंभिक व्याजदरावर होम लोन उपलब्ध करणार आहे. नवीन दर 7 ऑक्टोबर 2021 पासून लागू झाले आहेत. हे दर 31 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध राहतील.
प्रोसेसिंग फी नाही
बँकेचे नवीन दर त्या ग्राहकांना उपलब्ध होतील जे नवीन कर्जासाठी अर्ज करतील, तसेच लोन ट्रान्सफर किंवा सध्याचे कर्ज रिफायनान्स करायचे आहे. सोबतच होम लोनवर झीरो प्रोसेसिंग चार्जची ऑफर 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.
बँक ऑफ बडोदाचे जीएम- मॉर्गेज अँड ऑदर रिटेल असेट्स, एच. टी. सोलंकी यांनी सांगितले की,
बँक नेहमी होम लोन आणि इतर रिटेल लोन प्रॉडक्टवर व्याजाचे सर्वात जास्त स्पर्धात्मक दर देण्याचा प्रयत्न करते.
आमचा डिजिटल प्लॅटफॉर्म आणि टीम्सच्या माध्यमातून प्रक्रिया अखंड आणि समस्यामुक्त बनवली आहे.
येस बँकेने सुद्धा कमी केले होते दर
प्रायव्हेट सेक्टरमधील येस बँकेने (YES Bank) काही दिवसांपूर्वी होम लोनच्या विशेष ऑफर अंतर्गत केवळ 6.7 टक्केचा दर (Low Interest) सादर केला आहे.
येस प्रीमियर होम लोन (YES Premium Home Loan) नावाने 90 दिवसांसाठी लाँच या ऑफर अंतर्गत बँक 6.7 टक्केच्या प्रारंभिक व्याजदरावर होम लोन देत आहे.
तसेच महिलांसाठी 0.05 टक्केची अतिरिक्त सूट आहे. (Home Loan)
Web Title :- Home Loan | bank of baroda cuts home loan rates check latest rates here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sharad Pawar | ‘… म्हणून सत्ताधाऱ्यांनी आजची कारवाई केली, अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करणार’