Sharad Pawar | ‘… म्हणून सत्ताधाऱ्यांनी आजची कारवाई केली, अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करणार’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी (Income Tax Department Raid) केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्याची तुलना मी जालियनवाला बाग (Jallianwala Bagh) हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा, आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रीया असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही, अशा शब्दांत शरद पवार (Sharad Pawar) यांनी छापेमारीबाबत नाराजी व्यक्त केली. ते बारामती (Baramati) येथील गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, एखाद्या विषयासंबंधी शंका असल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे.
मात्र, अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे.
अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा याचा आता लोकांनीच विचार करावा, असेही त्यांनी म्हटले.

साक्षीदार हे एखादी घटना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्यासंबंधी न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावले जातात.
कारवाई वेळी पकडणे हे साक्षीदारांचे काम नाही. मुंबई ड्रग्ज प्रकरणातील (Mumbai drugs case) आरोपींना घेऊन जाणारे लोक शासकिय यंत्रणेचे नव्हते.
नंतर खुलासा करण्यात आला की ते साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. याचा अर्थ कारवाईत काही पक्षीय लोकांना सामावून घेण्यात आले होते.
ड्रग्स कारवाई झालीच पाहिजे, पण ती या पद्धतीने नको, असे मत शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

Web Title : sharad pawar todays action out anger authorities will endure abuse power many days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Education Allowance Claim | 4 लाख रुपयांचा ‘हा’ क्लेम केला नसेल तर चुकवू नका, एरियरसह मिळेल मोठी रक्कम; जाणून घ्या

Dearness Allowance | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! तब्बल ‘एवढया’ महिन्यांचा महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर

Diabetes | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल 15 मिनिटात कमी करतो ‘हा’ ज्यूस, एक्सपर्टचा दावा