3rd wave of covid in india | ऑनलाइन साजरा करा सण, 3 महिन्यांपर्यंत निष्काळजीपणा पडू शकतो महागात – केंद्राचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 3rd wave of covid in india | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता, केंद्र सरकारने लोकांना खबरदारीसह सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, शक्य असेल तर सण घरात साजरा करा. गर्दी करू नका आणि जर कुटुंब आणि नातेवाईकांसोबत सण साजरा करायचा असेल तर ऑनलाइन साजरा करा. (3rd wave of covid in india)

या देशांकडून घ्या धडा
केंद्राने दुसर्‍या देशांचे उदाहरण दिले आहे जिथे निष्काळजीपणा केल्याने कोरोनाच्या केसमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, इंग्लंड आणि नेदरलँडमध्ये फेस्टिव्हलमध्ये निष्काळजीपणा करण्यात आला आणि प्रकरणे वाढली. यातून धडा घेऊन पुढील तीन महिने विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

तीन महिन्यांत अनेक धर्मांचे सण
देशात दसरा, नवरात्री, दुर्गा पूजा, ईद, दिवाळी, क्रिसमस, न्यू ईयर सारखे सण येणार आहेत. आगामी तीन महिने खुप महत्वाचे आहेत. यासाठी सावधगिरी बाळगायची आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जास्त सावधगिरी बाळगायची आहे. (3rd wave of covid in india)

ICMR चा इशारा
यापूर्वी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने लोकांना भटकंती न करण्याचा सुद्धा इशारा दिला होता. कारण जगभरात लोक आपल्या घरातून फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. भारतात सुद्धा मोठ्या संख्येने पर्यटक पर्वतांकडे निघत आहेत.

पर्यटन स्थळांवर लोकांची गर्दी
पर्यटन स्थळांवर लोकांची गर्दी रोज दिसत आहे. ICMR ने इशारा दिला आहे की, लोकांच्या फिरण्याच्या या सवयीमुळे देशात लवकरच कोविड-19 ची तिसरी लाट येऊ शकते.

फेब्रुवारीत कोरोना उच्च स्तरावर असू शकतो
आयसीएमआर आणि इम्पीरियल कॉलेज लंडनच्या संशोधकांनी संयुक्त संशोधनात म्हटले आहे की, अशाप्रकारची भटकंती भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला निमंत्रण देऊ शकते. भारतात पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान कोरोना संसर्ग उच्च स्तरावर असण्याची शक्यता आहे.

 Web Title :- 3rd wave of covid in india | central government appeals public celebrate festivals online

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | ‘… म्हणून सत्ताधाऱ्यांनी आजची कारवाई केली, अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करणार’

Education Allowance Claim | 4 लाख रुपयांचा ‘हा’ क्लेम केला नसेल तर चुकवू नका, एरियरसह मिळेल मोठी रक्कम; जाणून घ्या

Dearness Allowance | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! तब्बल ‘एवढया’ महिन्यांचा महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर