घामोळ्यांनी बेजार आहात ? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास मिळेल आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात उन आणि आर्द्रतेमुळे नेहमीच घामोळ्या होतात. या त्रासापासून बचाव करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. हे उपाय घामोळ्यांचा त्रास ताबडतोब कमी करतात. घामोळ्यांमुळे त्रास होत असल्यास कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून घ्यावीत आणि ते पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करावी. यामुळे घामोळ्या लवकर दूर होतील. चंदन पावडर लावल्यानेही घामोळ्या दूर होतील.

तसेच चंदन पावडर पाण्यात घोळून याचा लेप घामोळ्यांवर लावू शकता. शरीर थंड ठेवण्यासाठी काकडी उपयोगी आहे. घामोळ्यांपासून बचावाचा हा चांगला उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस टाका आणि या पाण्यात काकडीचे पातळ तुकडे कापून टाकावेत. यानंतर हे तुकडे घामोळ्यांच्या जागेवर लावल्याने घामोळ्या लवकर बऱ्या होतात.

घामोळ्यांवर मुलतानी मातीचा लेप लावल्यानेही आराम मिळतो. यासाठी मुलतानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून त्याचा लेप तयार करावा. यामुळे घामोळ्यांमुळे होणारी जळजळ आणि खाज कमी होते. कोरफडीच्या पानांचा लेप दिवसातून दोनवेळा लावल्यानेही फायदा होतो. लहान बाळाला घामोळ्या झाल्यास अंघोळ घातल्यानंतर टॉवेलऐवजी हवेद्वारे त्याची त्वचा वाळू द्यावी.

बाळाला कॉटन किंवा मखमलीचे हलके कपडे घालावेत. यामुळे घामोळ्या बऱ्या होतात. आणखी एक उपाय म्हणजे कच्च्या आंब्याचा आहे. हा उपाय करण्यासाठी कच्चा आंबा मंद आचेवर भाजून घ्यावा व त्यातील गर काढून तो शरीरावर लेपासारखा लावावा. हा उपाय केल्यास घामोळ्या दूर होतील. कच्चा आंबा शरीराची उष्णता थंड करण्यामध्ये लाभदायक आहे. खोबरेल तेलात कापूर मिसळून घामोळ्यांवर लावावा. हे उपाय केल्यास घामोळ्यांच्या त्रासापसून आराम मिळतो.

आरोग्य विषयक वृत्त –

पपईच्या रस प्यायल्याने होतात ‘हे’ ७ फायदे

शुक्राणू वाढविण्यासाठी ‘ही’ आसने आहेत लाभदायक

गरोदरपणातील काही अविश्वसनीय गोष्टी, ज्या सत्य आहेत 

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा