Home Remedies To Lower Cholesterol | अवघ्या 5 रुपयात होईल हाय कोलेस्ट्रॉलपासून सुटका, ताबडतोब करा 2 चमत्कारी उपाय, मिनिटात दिसेल कमाल

नवी दिल्ली : Home Remedies To Lower Cholesterol | खराब जीवनशैलीमुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आजकाल सर्व वयोगटातील लोकांना सतावत आहे. कोलेस्ट्रॉल लेव्हल जास्त वाढल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. औषधांव्यतिरिक्त, घरगुती उपाय देखील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. स्वयंपाक घरातील काही खाद्यपदार्थांनी कोलेस्ट्रॉल लेव्हल कशी सहज कंट्रोल करता येते ते जाणून घेऊया (Home Remedies To Lower Cholesterol)…

कोलेस्ट्रॉल मुळापासून नष्ट करतील या वस्तू

  • डॉ सरोज गौतम यांच्या मते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रथम जवसाच्या बिया घ्या. मिक्सरमध्ये टाकून नीट बारीक करून त्याची पावडर बनवा. ही पावडर एक चमचा सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्या. असे केल्याने काही दिवसात कोलेस्ट्रॉल सामान्य होण्यास सुरुवात होईल. जवसाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. याचे दीर्घकाळ सेवन करणे सुरक्षित आहे. (Home Remedies To Lower Cholesterol)

  • आयुर्वेदात दालचिनी देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानली गेली आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यासोबत चिमूटभर दालचिनी पावडर घ्या. साधारण १ आठवडा असे केल्यास कोलेस्ट्रॉल लेव्हल मोठ्या प्रमाणात कंट्रोल राहते. हे आवश्य लक्षात ठेवा की, चिमूटभर दालचिनी पावडरपेक्षा जास्त वापरू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते.