होंडा सिटीची हॅचबॅक कार लॉंच, ‘या’ ठिकाणी करण्यात येणार पहिली विक्री

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   होंडा सिटी (Honda City) या कारने भारतीय बाजारावर अधिराज्य गाजवले आहे. जर सर्व काही असेच राहिले तर त्या कारची हॅचबॅक कार ( Hatchback Car) भारतात लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीने होंडा सिटी हॅचबॅक कार थायलंडमध्ये (Thailand) लाँच केली आहे. यामुळे सर्वांत पहिले थायलंड आणि इंडोनेशियामध्ये ( Indonesia) हॅचबॅक कारची विक्री सुरू करण्यात येणार आहे. भारतात होंडा सिटीची हॅचबॅक कार कधी लॉंच होईल, याची कोणतीही अधिकृत माहिती अजून भेटलेली नाही. सध्या कारचा लुक बनवण्यात आला आहे.

या कारची प्रतिकृती सेदान कारसारखीच आहे. होंडा सिटी हॅचबॅक कारचे बॉडी पॅनेल्सही सेदानानकडून घेण्यात आले आहेत. या कारला स्पोर्टसारखा लुक येण्यासाठी ब्लॅक आउट ग्रील आणि डार्क क्रोम फिनिश दिले गेले आहे. याव्यतिरिक्त कारमध्ये 16 इंचाचे अलॉय व्हिल्सदेखील लावण्यात आले आहेत. तसेच कारच्या इंटेरिअरमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. ते सेम सिटी सेदानसारखेच आहेत. या कंपनीने थायलंडमध्ये S+,SV आणि RS असे तीन व्हेरीअंट लॉंच केले आहेत. तसेच या कारमध्ये 1 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 122 एचपी पावरचे आहे.

याव्यतिरिक्त इंजिनासोबत सीव्हीटी गिअरब़ॉक्स देण्यात आला आहे. सिटी हॅचबॅकमध्ये जास्तीत जास्त फिचर्स होंडा सेदानचेच ( Honda Sednan) आहेत. थायलंडमध्ये या कारची किंमत भारतीय रुपयांनुसार 14.59 लाख रुपये ते 18.25 लाख रुपये एवढी आहे. S+ व्हेरिअंटची किंमत 14.59 लाख रुपये,SV व्हेरिअंटची किंमत 16.44 लाख रुपये तर RS व्हेरिअंटची किंमत 18.25 लाख रुपये एवढी आहे. ही कार भारतात कधी लॉंच होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण अशा प्रकारची एकही हॅचबॅक कार भारतीय बाजारात उपलब्ध नाही आहे.